HomeमनोरंजनHealth Care Tips Does eating ice cream help a cold know the...

Health Care Tips Does eating ice cream help a cold know the truth health myths health news | आईसक्रीम किंवा थंड खाल्ल्याने खरंच सर्दी जाते! काय आहे यामागचं सत्य?


आईस्क्रीम खाल्ल्याने सर्दी होण्यास मदत होते का? बऱ्याचदा सर्दी झाल्यानंतरही काहीजण आईस्क्रीम खातात  किंवा थंड पेय पितात. यावर त्यांना मनाई केल्यावर “उलट सर्दी झाल्यास आईस्क्रीम खाल्ले तर सर्दी कमी होते किंवा पूर्णपणे जाते” असे उत्तर देतात. काहीजणांना याचा खरा अनुभव येतो. पण हे कितपत खरे आहे? असे कसे होऊ शकते? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेलच. चला तर मग जाणून घेऊया यामगचं नेमकं सत्य काय आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञ सांगतात की, सर्दी झाल्यावर आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने सर्दी पूर्णपणे जाते, हा एक गैरसमज आहे . मात्र, तरीही काहीजणांना याचा चांगाल अनुभव का येतो? तर यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जर सर्दी होऊन तुमचा घसा दुखत असेल किंवा घशाला सुज आली असेल तर, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने घसा काहीवेळ सुन्न होतो. यामुळे घशाची जळजळ कमी होत आणि तात्पुरता आराम मिळतो. तुम्ही निरिक्षण केले असेल तर, मिंटची गोळी खाल्ल्यानेही असेच होते. याचकारणाने बऱ्याचदा टॉन्सिलच्या ऑपरेशननंतर डॉक्टर आईस्क्रीम खाण्याचा सल्ला देतात.

सर्दीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यास फायदा होतो का?

अनेकदा सर्दी झाल्यामुळे अशक्तपणा येतो, भूक लागत नाही. आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि कॅलरीज असतात. अशावेळी आईस्क्रीम खाल्ल्यास शरीराला काहीप्रमाणात का होईना पण ऊर्जा मिळते. तसेच ते गिळायलाही सोपे असते. सर्दीसोबत खोकलाही होतो. त्यामुळे घशाला खवखव आणि जळजळ होते. त्यामुळे तिखट अन्न खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. म्हणून अगदी काही प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते. पण सर्दीमध्ये जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाणे धोकादायकही ठरू शकते. यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते.

सर्दीमध्ये आईस्क्रीम खाणे सर्वांसाठीच फायदेशीर असते का?

सर्दी झाल्यावर आईस्क्रीम खाणे सर्वांसाठीच फायदेशीर नसते. दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास काहीजणांच्या शरीरातील लाळ किंवा कफ घट्ट होऊ शकतात. यामुळे नाक चोंदल्यासारखे वाटू शकते किंवा कफ बाहेर पडायला अडथळे येऊ शकतात. तुम्हाला झालेली सर्दी फक्त व्हायरल किंवा तात्पुरती नसून बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे झाली असेल, तर अति थंड पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळले पाहिजे. यामुळे घशाला अधिक त्रास होऊ शकतो.

सर्दीमध्ये थंड पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळायला हवे

सर्दी असल्यास थंड खाल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो. पण जर तुम्हाला कफ झाला असेल तर थंड पदार्थ खाणे टाळणेच योग्य ठरेल. विशेषतः लहान मुलांनी सर्दीमध्ये थंड पदार्थ खाणे टाळायलाच हवे. याऐवजी सर्दी कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे बरी करण्यासाठी गरमा गरम वाफाळलेला वेजिटेबल सूप, आलं आणि तुळशीच्या पानांपासून बनलेला काढा, दररोज कोमट पाणी पिणे हे सर्वात उत्तम घरगुती उपाय आहेत. अधिक त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

केरलम- डॉक्टरांचा पगार ₹20 हजार, तेवढाच सफाई कर्मचाऱ्याचा:गरजेपेक्षा 10 पट जास्त डॉक्टर; IMA ने...

0
केरलमच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात सर्वात मजबूत मानल्या जातात, परंतु तेथे डॉक्टरांना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एक एमबीबीएस कनिष्ठ डॉक्टर 12 ते...

एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर:’ऑपरेशन टायगर’नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी

0
'ऑपरेशन टायगर'च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या...

कथा: संताची रागीट व्यक्तीला शिकवण:राग आल्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण थांबा, हाच छोटासा...

0
राग हा माणसाचा असा शत्रू आहे, जो क्षणार्धात जवळच्या नात्यांनाही तोडू शकतो. रागात बोललेले शब्द अनेकदा मनावर अशा जखमा देतात, ज्या वेळ निघून...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
spot_img

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

0
महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत...

आरोग्य:तुम्हीही बेडवर बसून ऑफिसचे काम करता का? आजच ही सवय बदला, नाहीतर शरीराला गंभीर...

0
आरामदायक अंथरूण चांगल्या झोपेसाठी उपयुक्त असते, पण ते तुमच्या ऑफिस डेस्क म्हणून काम करू शकत नाही. डॉ. निखिल जैन, कन्सल्टंट, स्पाइन सर्जरी, मणिपाल...

समय रैनासोबत फोटो व्हायरल झाल्याने कुशा संतापली:म्हटले- हा माझा मित्र नाही, प्रायव्हेट पार्टवर विनोद...

0
काही काळापूर्वी एका रोस्ट शोमध्ये समय रैनाने कुशा कपिलावर अनेक आक्षेपार्ह विनोद केले होते. यानंतर कुशाने संतापून म्हटले होते की, वारंवार नकार देऊनही...
error: Content is protected !!