Homeमनोरंजनपाकिस्तानच्या जागी आईसलँडने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला, सोशल मीडियावर...

पाकिस्तानच्या जागी आईसलँडने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला, सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली


T20 विश्वचषक 2026 आइसलँड : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्यासाठी आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे. मात्र या स्पर्धेशी निगडित वाद काही संपण्याचं नाव घेत नाही. बांगलादेश या स्पर्धेतून बाहेर पडलाय, मात्र तरीही पाकिस्तानच्या उपलब्धतेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटलं होतं की, टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2026) स्पर्धेत पाकिस्तानचा संघ सहभागी होणार की नाही या संदर्भातील निर्णय 30 जानेवारी रोजी घेतला जाईल. त्यानंतर आइसलँडने (Iceland) म्हटलं होतं की, ते या स्पर्धेत पाकिस्तानची जागा घेण्यास तयार आहेत आणि तिकिटं विकत घेण्यासाठी उत्सुक असतं. मात्र आता आइसलँडने अजून एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करून वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिलाय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

काय म्हणालं आइसलँड क्रिकेट बोर्ड?

आइसलँड क्रिकेट बोर्डाने आपल्या ऑफिशियल एक्स अकाउंटवरून एक लांबलचक पोस्ट शेअर केली. यात त्यांनी थोड्या मजेशीर पद्धतीने आणि हलक्याफुलक्या भाषेचा वापर करून आइसलँडने स्वतःला वर्ल्ड कप 2026 मधून दूर केलं.

आइसलँड क्रिकेट बोर्डाने म्हटलं की, ‘आम्ही जड अंतःकरणाने जाहीर करतो की, आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची जागा घेण्यासाठी आम्ही उपलब्ध नाही, मग त्यांनी आत्ता माघार घेतली असो वा नसो. आता स्पर्धेसाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे, व्यावसायिक प्रशिक्षण घेणे आणि इतक्या कमी वेळात या जागतिक स्पर्धेत पोहोचणे आमच्यासाठी अशक्य आहे. आम्ही स्कॉटलंडसारखे नाही आहोत जे किट प्रायोजकाशिवाय मनाप्रमाणे येऊ शकतात.

आमचे खेळाडू वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून येतात आणि ते त्यांचा व्यवसाय सोडून जगाच्या दुसऱ्या बाजूला फिनलंडच्या उबदार पाण्यात खेळण्यासाठी जाऊ शकत नाहीत. आमचा कॅप्टन एक व्यावसायिक बेकर आहे, त्याला त्याच्या ओव्हनची काळजी घ्यावी लागते. आमच्या जहाजाच्या कॅप्टनला त्याचे जहाज चालवावे लागते आणि आमच्या बँकर्सना नोकरीला जावे लागते. हौशी स्तरावरील क्रिकेटचे हे कठोर वास्तव आहे.

आमच्या चाहत्यांसाठी ही बातमी अत्यंत निराशाजनक असेल. जगातील सर्वात शांत देशांपैकी एक असूनही, आमचे ऑनलाइन फॉलोअर्स खूप मोठे आहेत आणि X वर आम्ही जगातील १४ व्या क्रमांकाचे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राष्ट्रीय बोर्ड आहोत. 1693 मध्ये लँडेनच्या लढाईत विल्यम ऑफ ऑरेंजच्या पराभवानंतर डचांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी आम्ही सज्ज होतो आणि अमेरिकन ग्रीनलँड ताब्यात घेण्यास उत्सुक होते, किंवा किमान त्यांच्या केशरी पोशाखातील नेत्याला असे वाटत होते.

आमचा पराभव युगांडाचा फायदा ठरू शकतो. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या जॅकेटकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. अपस्माराच्या आजारांव्यतिरिक्त, आणि जर तुम्हाला अपस्मार असेल तर त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले. भविष्य नेहमीच बर्फासारखे असते, जोपर्यंत ते वितळत नाही.

स्कॉटलंडची मागच्या दाराने झाली एंट्री :

बांगलादेशने टी 20 वर्ल्ड कप 2026 चे सामने खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिल्यावर स्कॉटलंडची मागच्या दाराने वर्ल्ड कप 2026 मध्ये एंट्री झाली. अशी चर्चा होती की पाकिस्तानने सुद्धा जर वर्ल्ड कप 2026  खेळण्यावर बहिष्कार टाकला तर त्यांच्या जागी आइसलँड स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक आहे.

हेही वाचा : आयND vs PAK: भारत – पाकिस्तान संघाला एकाच छताखाली राहण्यास भाग पडलं, नेमकं कारण काय?





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!