Homeसांस्कृतिकVastu Tips: पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये? कारण जाणून व्हाल थक्क

Vastu Tips: पती-पत्नीने एका ताटात का जेवू नये? कारण जाणून व्हाल थक्क


मराठीत वास्तु टिप्स: वास्तुशास्त्रात अन्न आणि ऊर्जा यांचा खूप जवळचा संबंध मानला जातो. आपण रोज जे अन्न खातो, त्यातून केवळ शरीरालाच नाही तर मनालाही ऊर्जा मिळते. मात्र, जेवण करताना काही चुकीच्या सवयी असतील तर हीच सकारात्मक ऊर्जा हळूहळू नकारात्मक ऊर्जेत बदलू शकते. अनेकदा घरात कारण नसताना तणाव, वाद, आरोग्य समस्या किंवा आर्थिक अडचणी निर्माण होतात. यामागे दैनंदिन सवयींसह जेवणाची पद्धतही कारणीभूत असू शकते, असं वास्तुशास्त्र सांगतं. म्हणूनच योग्य पद्धतीने, शांत मनाने आणि नियम पाळून जेवण करणं खूप महत्त्वाचं ठरतं. यामुळे घरात सकारात्मक वातावरण टिकून राहतं आणि कुटुंबातील नातेसंबंधही मजबूत होतात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

जेवणाची पद्धत आणि घरातील ऊर्जा

वास्तुशास्त्र; वास्तुशास्त्रानुसार जेवताना असलेली शिस्त आणि सवयी घरातील ऊर्जेवर थेट परिणाम करतात. घाईघाईत, उभं राहून किंवा रागाच्या अवस्थेत जेवण केल्यास नकारात्मकता वाढते. जेवण करताना मन शांत असणं, मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहणं गरजेचं मानलं जातं. कारण त्या क्षणी अन्नासोबत विचारांची देवाणघेवाणही होत असते. चुकीच्या सवयींमुळे घरात कर्ज वाढणं, सतत वाद होणं किंवा आरोग्य बिघडणं अशा समस्या दिसून येतात, असं मानलं जातं.

पती-पत्नीने एकाच ताटात जेवण करणे योग्य आहे का?

वास्तुशास्त्रात पती-पत्नीने एकाच ताटात जेवू नये, असं सांगितलं जातं. कारण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची भूमिका वेगळी असते. घराचा प्रमुख हा केवळ पत्नीचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा आधार असतो. जर पती-पत्नी सतत एकाच ताटात जेवत असतील, तर त्याचा परिणाम असा होतो की इतर सदस्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. यामुळे घरात नकळत मतभेद, गैरसमज आणि तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतंत्र ताटात, पण एकत्र बसून जेवण करणं अधिक योग्य मानलं जातं.

हे ही वाचा: Planate Effects Accidents: मंगळ किंवा शनीच नाही ‘हे’ ग्रह ठरतात अपघाताचं कारण; वेळीच करा उपाय नाही तर…

वास्तुदोष टाळण्यासाठी जेवणाची वेळ, दिशा, बसण्याची पद्धत आणि सवयी याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अन्नाचा आदर ठेवणं, शांतपणे जेवण करणं आणि कुटुंबासोबत संवाद साधत जेवण करणं घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते. या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळल्यास घरात सुख, शांती आणि समाधान टिकून राहू शकतं.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!