Homeसांस्कृतिकKundli Planet Astrology: अपघातामागे कोणत्या ग्रहांचा असतो हात? ज्योतिषशास्त्रीय कारणे आणि खबरदारीचे...

Kundli Planet Astrology: अपघातामागे कोणत्या ग्रहांचा असतो हात? ज्योतिषशास्त्रीय कारणे आणि खबरदारीचे उपाय


कुंडली ग्रह स्थितीमुळे अपघात होतो: दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांमागे ग्रहस्थिती कारणीभूत मानली जाते. अचानक होणाऱ्या अपघातांनाही ग्रहदोष जबाबदार असतात, असे ज्योतिषात सांगितले जाते. विशेषतः वाहन अपघात, स्फोट, भांडणे किंवा अनपेक्षित संकटे यामागे काही ठराविक ग्रह सक्रिय असतात. ग्रहांची दिशा बदलली की त्याचा थेट परिणाम माणसाच्या मनावर, निर्णयक्षमतेवर आणि एकाग्रतेवर होतो. त्यामुळे काही काळात अपघातांची शक्यता वाढते. अशा वेळी योग्य काळजी, संयम आणि पारंपरिक उपाय केल्यास संकटे टाळता येऊ शकतात, असा विश्वास आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

ज्योतिष अभ्यासकांच्या मते सूर्य आणि चंद्र हे अपघातांसाठी प्रमुख ग्रह मानले जातात. त्यानंतर राहु, मंगळ आणि शनी यांचा प्रभावही अपघातांशी जोडला जातो. मंगळ ग्रह आक्रमकता, घाई आणि अस्थिरता वाढवतो, त्यामुळे वाहन चालवताना चूक होण्याची शक्यता अधिक असते.

अपघातांचा कालावधी
रात्री 12 ते दुपारी 3 हा काळ संवेदनशील मानला जातो. या वेळेला पितरांचा काळ समजला जातो. या दरम्यान मन विचलित होणे, निर्णय चुकणे किंवा लक्ष भटकणे याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या वेळेत प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

अमावस्येचे महत्त्व
अमावस्या हा दिवस पितरांसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी केलेले दान, स्नान आणि स्मरण सकारात्मक फल देतात, अशी श्रद्धा आहे. अमावस्येला वाहन चालवण्याआधी पितरांचे मनोमन स्मरण करून त्यांना प्रणाम केल्यास अपघातांपासून संरक्षण मिळते, असे मानले जाते.

या दिवशी नदी, तलाव किंवा जलाशयात माशांना दाणा टाकणे शुभ समजले जाते. तसेच गरजू, वृद्ध किंवा असहाय लोकांना अन्न, वस्त्र किंवा आवश्यक वस्तूंचे दान केल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे अनैसर्गिक आपत्ती आणि अपघातांपासून बचाव होऊ शकतो, असा विश्वास आहे.

हे ही वाचा: Ankshastra: तरुणांनो ‘या’ मुलांकाच्या पोरींपासून सावध राहा! त्यांना राग आला तर असं काही करतील की…

ग्रहदोष शांत करण्यासाठी दान
राहु ग्रहासाठी काळे तीळ, काळी उडीद, मोहरी, चण्याची डाळ किंवा कोळसा दान करता येतो. हे पदार्थ स्वतःभोवती फिरवून नदीत अर्पण करण्याची पद्धत सांगितली जाते. मंगळ ग्रह शांत करण्यासाठी लाल रंगाची मिठाई किंवा मंगळाशी संबंधित धान्य माशांना घालणे लाभदायक मानले जाते.

हे सर्व उपाय श्रद्धा आणि सकारात्मक भावनेतून केल्यास मन शांत राहते. सावधपणा, संयम आणि योग्य काळजी यासोबत हे पारंपरिक उपाय केल्यास अपघातांची शक्यता कमी होऊ शकते, असा ज्योतिषशास्त्राचा दृष्टिकोन आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!