HomeमनोरंजनHealth Care Tips What is the Benefits Of Walking 20 Minuts Daily...

Health Care Tips What is the Benefits Of Walking 20 Minuts Daily In Marathi | रोज फक्त 20 मिनिटे चालल्यावर शरीरात काय बदल होतात? फायदे ऐकून थक्क व्हाल!


दररोज 20 मिनिटे चालण्याचे फायदे: आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचे परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर, मानसिक आरोग्यावरही होत असतात. कामाच्या व्यस्ततेमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. तसेच काही कामे अशी असतात, ज्यामध्ये सलग 8 ते 9 तास एकठिकाणी बसून काम करावे लागते. शरीराची फारशी हालचाल होत नाही. याशिवाय खाण्याच्या वेळा पाळता येत नाहीत, जंक फूडचे सेवन वाढते. लठ्ठपणा वाढतो, व्यायाम करण्यासही वेळ मिळत नाही. कामाच्या ठिकाणी वाढता ताण, रोजचा धकाधकीचा लोकल प्रवास यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. सतत थकवा जाणवतो. मुख्य म्हणजे रोज तेच काम, तोच प्रवास यामुळे जीवनातील आनंद हरवून गेला आहे असे वाटते. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, रोज फक्त 20 मिनिटे चालणे या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अनेक जणांना कामाच्या व्यस्ततेमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यांच्यासाठी देखील दररोज फक्त 20 मिनिटे चालणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे फक्त आरोग्यदायी फायदेच नाही तर, रोज एक नवीन ऊर्जाही मिळेल. तुम्ही तुमच्या रोजच्या कंटाळवाण्या दिवसाचे रूपांतर एका ऊर्जात्मक आणि आनंददायी दिवसात करू शकता.

दररोज 20 मिनिटे चालल्याने काय फायदे मिळतात?

1. मानसिक आरोग्य सुधारते

चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन (Endirphins) हे ‘फील-गुड’ हार्मोनची निर्मिती होते. यामुळे तणाव कमी होतो, चांगली झोप मिळते, स्मरणशक्तीही सुधारते आणि आनंददायी वाटते.

2. हृदयाचे आरोग्य

शरीराची हालचाल न झाल्यास रक्ताभिसरण संस्था मंदावते. शरीरात योग्यप्रकारे रक्तप्रवाह होत नाही. रोज फक्त 20 मिनिटे चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत होते, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रोल नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे सुमारे 30 टक्क्यांपर्यंत हृदयाचा धोका कमी होतो.

3. पचन सुधारते आणि वजन नियंत्रित राहते

जरी कमी व्यायाम करत असला किंवा व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तरी, दरोरज 20 मिनिटे चालल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. तसेच जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

4. स्नायू आणि हाडे मजबूत होतात

चालल्यामुळे पायांचे स्नायू आणि कमरेचे स्नायू मजबूत होतात. तसेच हाडांची घनता वाढते. ज्यामुळे भविष्यात सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

5. शारीरिक ऊर्जा वाढते

चालल्यामळे शरीरातील पेशींना अधिक ऑक्सिजन मिळतो. यामुळे दिवसभर येणारा थकवा नाहीसा होतो. दिवसभरात अधिक ऊर्जा जाणवते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...
spot_img

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
error: Content is protected !!