Homeमहाराष्ट्रअजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यू


अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. 66 वर्षीय अजित पवारांसहीत विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अजित पवारांसोबत सावलीसारखे फिरणारे त्यांचे बॉडीगार्ड विदीप दिलीप जाधव यांचाही समावेश आहे. जाधव यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. विटाव्याचे सुपुत्र असलेले विदीप हे मुंबई पोलीस दलातील सन 2009 बॅच पोलीस शिपाई होते. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ म्हणजेच पर्सनल सिक्युरीटी ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावत असताना विमान अपघात मृत्यू झाला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

गावकरी हळहळले

ठाण्यातील कळवा येथे राहणारे अजित दादांचे विश्वासू बॉडीगार्ड विदीप हे सुद्धा अपघात झाला तेव्हा अजित पवारांसोबत विमानात होते. सावलीप्रमाणे अजित पवारांसोबत राहणारे विदीप यांचाही या अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  कर्तव्यनिष्ठा, निष्ठा आणि शांत स्वभाव यांचं जिवंत उदाहरण असलेले विदिप जाधव यांच्या अकाली मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विदिप ज्या विटावा गावातून येतात तेथील नागरिक हादरुन गेले आहेत. संपूर्ण गावासाठी विदिप यांचं असं आकस्मिक जाणं धक्का देणारं ठरलं आहे. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावान जवान, एक कर्तव्यदक्ष योद्धा आणि एक उत्तम माणूस हरपला अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या कठीण प्रसंगी जाधव कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना असं गावकऱ्यांनी जाधव कुटुंबाचं सांत्वन करताना म्हटलं आहे.

ते 5 जण कोण होते?

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याने कोणीही वाचू शकलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांसहीत एकूण 5 जण प्रवास करत होते. या सर्वांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे. अजित पवारांसह एकूण 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य होते.

तीन मृतदेह घटनास्थळी सापडले

पुणे पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी बारामतीमधील विमान अपघाताची माहिती दिली. तीन मृतदेह घटनास्थळी सापडल्याची माहिती संदीप सिंह गिल यांनी दिली आहे. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. अपघात स्थळी तीन मृतदेह सापडले असून तीनही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!