IND VS ZIM : अंडर 19 वर्ल्ड कप 2026 मध्ये (U19 World Cup 2026) टीम इंडियाने (Team India) ग्रुप स्टेजचे सर्व सामने जिंकून सुपर सिक्स स्टेजमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर मंगळवारी भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND VS ZIM) यांच्यात सुपर सिक्सचा सामना खेळवला गेला. यात सुरुवातीला झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करून 352 धावा केल्या आणि 353 धावांचं आव्हान दिलं. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात झिम्बाब्वे अयशस्वी ठरली आणि त्यांना 148 धावांवर ऑल आउट करण्यात भारतीय संघाला यश आले.
वैभव आणि एरोनने करून दिली जोरदार सुरुवात :
वैभव सूर्यवंशी आणि त्याचा जोडीदार एरोन जॉर्जने टीम इंडियासाठी वेगवान सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. एरोन जॉर्ज 23 धावा करून आउट झाला पण वैभवने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. वैभव सूर्यवंशीने फलंदाजी करताना 30 बॉलमध्ये 52 धावांची खेळी केली या दरम्यान त्याने 4 सिक्स आणि 4 चौकार लगावले. टीम इंडियाकडून विहान मल्होत्राने 109 धावांची खेळी करत अर्धशतक ठोकले. टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून 352 धावांची खेळी केली. टीम इंडियाने 8 विकेट्स गमावून 352 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला 353 धावांचे आव्हान दिले.
टीम इंडियाने झिम्बाब्वेच्या संघाला विजयासाठी 353 धावांचे आव्हान दिलं. तेव्हा इनिंगच्या दुसऱ्याच बॉलवर झिम्बाब्वेने एक विकेट गमावली. झिम्बाब्वेकडून लीरॉय चिवौलाने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. तातेंडा चिमुगोरोने 29, कियान ब्लिग्नॉटने 37 धावांची खेळी केली. मात्र याशिवाय टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कोणालाही फार काळ मैदानात टिकू दिले नाही. भारतीय गोलंदाज आर एस अंबरिशने 2 विकेटस, उद्धव मोहन आणि आयुष म्हात्रेने प्रत्येकी 3 विकेट, खिलन पटेल आणि हेनिल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 37.4 व्या ओव्हरपर्यंत झिम्बाब्वेच्या सर्व फलंदाजांना बाद करण्यात टीम इंडियाला यश आलं. ज्यामुळे झिम्बाब्वे फक्त 148 धावा करु शकली. भारताचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय होता.
हेही वाचा : भारतीय क्रिकेटरला ड्रिंक अँड ड्राइव्ह केसमध्ये अटक, दारू पिऊन गाडी चालवत केला भयंकर अपघात
प्लॅनिंग 11:
आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधर), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू, वेदांत त्रिवेदी, आर.एस. अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन
झिम्बाब्वे संघाची प्लेईंग 11 :
नॅथॅनियल हलाबांगना, ध्रुव पटेल, कियान ब्लिग्नॉट, ब्रेंडन सेनगेरे, लीरॉय चिवौला, मायकेल ब्लिग्नॉट, सिम्बराशे मुडगेनगेरे, ताकुडज्वा माकोनी, ततेंडा चिमुगोरो, पनाचे माझाई, वेबस्टर मधिधी.





























