स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आहे. या वेळी ती स्प्लिट्सविला X6 मध्ये धमाकेदार पुनरागमन करत आहे. या सिझनमध्ये ती निया शर्मासोबत ‘मिसचीफ मेकर’ या भूमिकेत दिसणार आहे. शोमध्ये प्रेम आणि पैशांच्या संघर्षावर आधारित कथानक उलगडले जाणार असून, उर्फी आणि निया स्पर्धकांसाठी अनेक ट्विस्ट आणि टर्न घेऊन येणार आहेत.
उर्फी जावेदने दिव्य मराठीशी दिलेल्या मुलाखतीत निया शर्मासोबतच्या तिच्या बॉन्डिंगबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही मनमोकळेपणाने चर्चा केली.
‘मिसचीफ मेकर’ म्हणून आम्ही खेळात ट्विस्ट आणणार
उर्फीने सांगितले की, ‘मी आणि निया शर्मा या सिझनमध्ये मिसचीफ मेकर्स आहोत. आमची भूमिका कोणाच्या बाजूने निर्णय घेण्याची नाही, तर खेळाला अधिक मनोरंजक बनवण्याची आहे. जेव्हा स्पर्धकांना वाटते की सर्व काही त्यांच्या नियंत्रणात आहे, तेव्हाच आमची एंट्री होते. आम्ही असे ट्विस्ट आणतो जे त्यांच्या नियोजनाला बिघडवून टाकतात.’
निया सोबत जोडीबद्दल काय म्हणाली उर्फी?
उर्फीने पुढे सांगितले की, ‘सुरुवातीला मला कळले की माझ्यासोबत आणखी एक मुलगी असेल, तेव्हा मनात प्रश्न आला की शोचे डायनॅमिक्स कसे असतील. पण निया शर्मा असल्याचे कळल्यावर सर्व शंका दूर झाल्या. निया खूप मजबूत आणि अनुभवी व्यक्ती आहे. शोपूर्वी आमची फक्त औपचारिक ओळख होती, पण शूटिंगनंतर आमची बॉन्डिंग वाढली आणि आज आम्ही चांगले मित्र झालो आहोत.’
पैशाचे प्रेम? urfichan स्पष्ट उत्तर
या सिझनची थीम ‘पैसा आणि प्रेम’ असताना उर्फीने विचारलेल्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिले: “मी कोणताही विचार न करता प्रेमाला निवडेन. पैसे महत्त्वाचे आहेत, पण सध्या माझ्या आयुष्यात प्रेमाचे महत्त्व जास्त आहे कारण मला लग्न करायचे आहे. सध्या मी सिंगल आहे आणि माझ्या योग्य जोडीदाराची वाट पाहत आहे.’
‘ड्रीम मॅन’ बद्दलचं खास मत
उर्फीने सांगितले की, “माझी मागणी खूप साधी आहे, तो एक जिवंत माणूस असावा. मला परफेक्शन किंवा कोणतीही चेकलिस्ट नको आहे. पण अडचण अशी आहे की मला सध्याच्या काळात योग्य मुलगा मिळत नाही.”
स्प्लिट्सविलात खोटे सिंगल म्हणणे चुकीचे
स्प्लिट्सविलात अनेकदा स्पर्धक स्वतःला सिंगल असल्याचे सांगतात, परंतु नंतर समोर येते की ते आधीपासून कोणालातरी डेट करत आहेत. यावर उर्फीने स्पष्टपणे मत मांडले: “हे ऐकून खूप वाईट वाटते. स्प्लिट्सविला हा डेटिंग शो आहे आणि यात फक्त सिंगल लोकांनीच यायला हवे. जर कोणी प्रसिद्धीसाठी खोटं बोलून येत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी अशा गोष्टींना सपोर्ट करत नाही.”
‘मी लहानपणी स्प्लिट्सविला पाहायचे; आज त्याचा भाग’
उर्फीने सांगितले की, ‘मी लहानपणी हा शो टीव्हीवर पाहायचे. आज त्या शोचा भाग आहे, हे विचार करूनच खूप छान आणि विचित्र वाटते. कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी या प्लॅटफॉर्मवर येऊन लोकांना एंटरटेन करेन.’
निहारिका तिवारीसोबतचा भूतकाळ सत्य काय?
सोशल मीडियावर उर्फी आणि स्प्लिट्सविलाची स्पर्धक निहारिका तिवारी यांच्यातील भूतकाळाबद्दल चर्चा सुरू आहे. यावर उर्फीने स्पष्ट केले की, “आमचा भूतकाळ फक्त एवढाच आहे की मी निहारिका तिवारीला आधीपासून ओळखते. एक मुलगा होता जो आम्हा दोघींनाही डबल डेट करत होता. तिथूनच आमची ओळख झाली. याव्यतिरिक्त आमच्यात कोणतंही भांडण किंवा नाटक नाही.”





























