Homeदेश-विदेशइराण-अमेरिका तणाव USS अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेचे आगमन मध्य पूर्व इराणमध्ये तणाव...

इराण-अमेरिका तणाव USS अब्राहम लिंकन विमानवाहू युद्धनौकेचे आगमन मध्य पूर्व इराणमध्ये तणाव आहे


इराण-अमेरिका तणाव: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विविध धोरणांमुळं सातत्यानं प्रकाशझोतात असणाऱ्या आणि जागतिक पटलावर अनेक देशांवर परिणाम करणाऱ्या अमेरिकेनं आता इराणची चिंता वाढवली आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडनं सोमवार (26 जानेवारी 2026) रोजी त्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची घोषणा करत लढाऊ युद्धनौका, एअरक्राफ्ट कॅरिअर USS अब्राहम लिंकन मध्यपूर्वेपर्यंत आणल्याचं स्पष्ट केलं. या निर्णयामुळं सदर क्षेत्रामध्ये अमेरिकी सैन्याला आणखी बळकटी मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अमेरिकेकडून ही युद्धनौका तैनात करण्यामागे हल्ला आणि बचाव क्षमतते वाढ करण्याचा थेट मनसुबा पाहायला मिळत असून त्यामुळं आता डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील हल्ल्याचा पर्याय खुला झाल्याचं म्हटलं जात आहे. CENTCOM नं सोशल मीडियाच्या माध्यमातून जारी केलेल्या माहिती आणि काही छायाचित्रांनुसार USS अब्राहम लिंकनवर अमेरिकी लष्कराचे जवान आणि नौदल अधिकार नियमित कार्यात व्यग्र असल्याचं स्पष्ट झालं.

ही युद्धनौका इतकी पुढपर्यंत का आली?

एका अधिकृत पत्रकातून दिलेल्या माहितीत कमांडनं सांगितल्यानुसार अब्राहम लिंकन ही युद्धनौका तुकडीला क्षेत्रीय संरक्षण आणि स्थिरता देण्यासाठी मध्यपूर्वेत तैनात करण्यात आली आहे. यापूर्वी गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या माहितीनुसार अमेरिकनं सावधगिरी बाळगत इराणच्या दिशेनं पाठवण्यासाठी मोठी नौदल तुकडी सज्ज केल्याचं म्हटलं होतं. ज्यामुळं  टम्प कधीही इराणवरील हल्ल्याचे आदेश देऊ शकतात अशी भीतीसुद्धा आता वैश्विक घटनांच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

किलिंग मशीन… युद्धनौकेची ही ओळख नेमकं काय सांगू पाहते?

USS Abraham Lincoln, किंवा CVN-72 ही एक निमिट्ज श्रेणीतील आण्विज उर्जेवर कार्यान्वित होणारी युद्धनौका आहे. ही युद्धनौका अमेरिकी नौदलातील Carrier Strike Group-3 चं नेतृत्त्वं करते. जगातील सर्वात शक्तिशाली सागरी संरक्षणार्थ तैनात असणाऱ्या युद्धनौकांपैकी हीसुद्धा एक असून, 19 जानेवारी रोजी अमेरिकेची ही तुकडी मलक्का जलडमरूमध्याहून पुढे गेली. यादरम्यान Arleigh Burke-class guided missile destroyers तैनात करण्यता आले. ज्यामध्ये USS Frank E. Petersen Jr, USS Spruance, USS Michael Murphy यांचा समावेश आहे.

इराण आणि अमेरिकेत का वाढतोय तणाव?

डिसेंबर महिन्यापासूनच इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनात वाढ झाली असून, यामध्ये हजारोंचा मृत्यू ओढावला आहे. इतकंच नव्हे तर, अनेकांना अटक करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. इराण सरकारनं ही आकडेवारी स्पष्टपणे नाकारली असली तरीही ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद करताना अमेरिकेती एक मोठी नौदल तुकडी या क्षेत्राच्या दिशेनं पुढे जात असून गरज भासल्यास या तुकडीची मदत घेतली जाईल आणि अमेरिका कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे असं म्हटलं. ट्रम्प यांच्या या वक्तव्याकडे सारं जग अमेरिकेचं दबाव तंत्र म्हणून पाहत आहेत, जिथं लष्करी दबाव आणि राजकीय अस्थिरता या दोघांचाही समावेश आहे.

इराणची यादरम्यान काय भूमिका?

एकिकडे अमेरिकेकडून लष्करी बळ वाढवण्यासाठी योगदान दिलं जात असतानाच अमेरिकेच्या या हाचलाची पाहता जर देशावर कोणताही लष्करी हल्ला झाला तर, त्याचं उत्तर अधिक कठोर आणि निर्णायक स्वरुपात दिलं जाईल असा स्पष्ट इशारा इराणनं दिला. ज्यामुळं मध्यपूर्वेतील तेलपुरवठा, तेल साठे, सागरी मार्ग आणि त्यांच्या संरक्षणासमवेत क्षेत्रीय स्थिरतेसंदर्भातील चिंतेत भर पडली आहे.

अमेरिका- इराणच्या तणावावर तोडगा कसा निघणार?

अमेरिका आणि इराणमध्ये तणाव दर दिवशी वाढत असला तरीही अमेरिकेनं दिलेल्या संकेतांनुसार अद्यापही चर्चेचा मार्ग खुला असून, ही वाट पूर्णपणे बंद झालेली नाही. एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार चर्चेसाठीच्या अटींची इराणला पूर्ण कल्पना असून आता चेहरानला याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळं आता या मार्गाचा वापर ही राष्ट्र करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!