Homeदेश-विदेशबजेट 2026 सरकार तुम्हाला देऊ शकते भाड्याच्या घरासाठी मोठी भेट मराठी बातम्या

बजेट 2026 सरकार तुम्हाला देऊ शकते भाड्याच्या घरासाठी मोठी भेट मराठी बातम्या


बजेट 2026: शहरी भागात वाढत्या लोकसंख्येमुळे भाड्याने राहण्यासाठी योग्य घरे कमी पडतायत. क्रेडाईने केंद्र सरकारकडे एक मोठे अभियान सुरू करण्याची मागणी केलीय ज्यात टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये स्वस्त भाड्याने घरे बांधण्यासाठी विकसकांना आणि भाडेकरूंना करात सूट देण्याचा समावेश आहे. यामुळे अनधिकृत वस्त्या कमी होतील आणि नोकरीसाठी शहर बदलणाऱ्या लोकांना सहज निवारा मिळेल. या अभियानामुळे मजबूत भाडे व्यवस्था निर्माण होईल. ज्याने शहरातील कामगार वर्गाला फायदा होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. असे झाल्यास लाखो लोकांच्या राहण्याच्या समस्या कमी होणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भाडेकरूंना कर सवलती

भाड्याने राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक भार कमी करण्यासाठी क्रेडाईने भाडेकरूंना थेट कर सवलती देण्याची शिफारस केली आहे. यामुळे भाडे कमी होऊन शहरातील प्रवासी लोकांना राहणे सोपे होईल. सरकारने विकसकांना प्रोत्साहन देऊन अधिक भाड्याची घरे उपलब्ध करावीत, ज्याने अवैध बांधकामांना आळा बसेल, अशी मागणी आहे. हे पाऊल शहरातील वर्कफोर्सला मजबूत आधार देऊन जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवणारे ठरणार आहे.

परवडणाऱ्या घरांची व्याख्या

2017 मध्ये ठरलेली परवडणाऱ्या घरांची व्याख्या आता जुनी झालीय. कारण जमिनी आणि बांधकाम सामग्रीच्या किंमती वाढल्यायत. क्रेडाईने 45 लाख रुपयांची मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी केलीय. मेट्रो शहरांमध्ये कार्पेट क्षेत्र 90 चौरस मीटर आणि इतर शहरांमध्ये 120 चौरस मीटरपर्यंत वाढवावे, असे सुचवले आहे. यामुळे मोठी घरेही परवडणारी श्रेणीत येतील आणि खरेदीदारांना कमी जीएसटी आणि इतर फायदे मिळतील. हे बदल सामान्य लोकांना घर खरेदी करणे सोपे करतील आणि रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल.

गृहकर्ज व्याजावर कर कपात

घर खरेदी हा सामान्य माणसाचा मोठा आर्थिक निर्णय असतो, पण व्याजाचा भार त्याला अवघड करतो. क्रेडाईने गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी कर कपात 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. यामुळे घर खरेदीदारांना मोठी आर्थिक मदत मिळेल आणि त्यांची मासिक हप्ते कमी होतील. हे पाऊल मध्यमवर्गीय कुटुंबांना घर घेण्यासाठी प्रेरणा देईल आणि बाजारात मागणी वाढेल. अशा सवलतींमुळे लोकांच्या स्वप्नातील घर साकार होण्यास मदत होणार आहे.

रिअल इस्टेट क्षेत्र अधिक मजबूत

परवडणाऱ्या घरांसाठी सध्या 1 टक्के जीएसटी आहे पण क्रेडाईने ही सुविधा मोठ्या घरांनाही लागू करण्याची मागणी केलीय. व्याख्या बदलल्यानंतर मोठ्या क्षेत्रफळाच्या घरांनाही हे फायदे मिळावेत, ज्याने विकासकांना अधिक बांधकाम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र मजबूत होईल आणि शहरातील घरांची उपलब्धता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!