सर्वात स्वस्त डिझेल एसयूव्ही: ऑफरोडिंग अर्थात साचेबद्ध शहरी रस्त्यांना शह देत काहीशा आव्हानात्मक वाटांवर निघत प्रवासाचा वेगळा अनुभव घेण्याकडे अनेक प्रवासप्रेमींचा कल असतो. ही मंडळी सतत एखद्या योग्य आणि त्यांना साजेशा वाहनाच्याही सतत शोधात असतात. याच मंडळींसाठी डिझेल एसयुव्ही आजसुद्धा तितकाच उत्तम पर्याय ठरतात. वाहनांमधून मिळणारा अधिक टॉर्क, उत्तम ताकद आणि इंधनाचा होणारा वापर ही त्यामागची काही खास कारणं.
प्रवासप्रेमी आणि त्यातही ऑफरोडिंगचा थरार अनुभवण्यासाठी 7 सीटर एसयुव्ही एक उत्तम पर्याय असून या कारच्या माध्यमातून कुटुंबातील प्रत्येकालाच घेऊन लांबच्या प्रवासासाठी निघू शकता. पाहा तर मग, खिशाला परवडणाऱ्या दरात येणाऱ्या SUV आहेत तरी कोणत्या…
महिंद्रा बोलेरो निओ
Mahindra Bolero Neo ही बोलेरो कारचं मॉडर्न वर्जन असून, या कारची प्रारंभी किंमत 9.43 लाख रुपये असून यामध्ये 1.5 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. ज्यातून 100 बीएपी पॉवरसह 260 एनएम टॉर्क जनरेट होतो. ही कार 17 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देत असून बोलेरोहून तिचं डिझाईन अधिक आकर्षक आहे.
महिंद्रा बोलेरो
महिंद्राची बोलेरो ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि किफायतशीर एसयुव्ही असून, या 7 सीटर कारची किंमत साधारण 9.28 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.5-लीटर mHawk डिझेल इंजिन असून, त्यातून 75 बीएचपी पॉवर आणि 210 एनएम टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणारी ही कार 16 किमी/ लीटर इतकं मायलेज देते.
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक, स्कॉर्पिओ एन
Scorpio Classic ही एक अतिशय विश्वासार्ह कार असून, कारप्रेमींचा प्राधान्यक्रम इथूनच सुरू होतो. या कारची किंमत 13.03 लाखांपासून सुरू होऊन त्यात 2.2 लीटर डिझेल इंजिन मिळतं. 130 बीएचपी आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करणारी ही कार 15 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. अग्रेसिव्ह लूक स्ट्राँग सस्पेंशनमुळं ही कार ऑफरोडिंगसाठी उत्तम ठरते.
महिंद्रा XUV700
Mahindra XUV700 ही एक प्रिमियम एसयुव्ही असून, या कारची किंमत 14.18 लाखांपासून सुरू होते. 2.2 लीटर इतकं डिझेल इंजिन असणारी ही कार 200 बीएचपी पॉवरसह 17 किमी प्रति लीटर इतकं मायलेज देते. 10.25-इंच टचस्क्रीन, लेवल-2 ADAS, 360-डिग्री कॅमेरासह या कारमध्ये पॅनोरॅमिक सनरुफ असे फिचर मिळतात. 6 आणि 7 सीटर अशा दोन पर्यायांमध्ये ही कार लक्झरी प्रवासाच्या चाहत्यांसाठी प्राधान्यस्थानी असते.
टाटा सफारी
भारतीय कारप्रेमींमध्ये Tata Safariला प्रचंड लोकप्रियता असून, ही कार 14.66 लाख रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. 2.0 लीटरचं क्रायोटेक डिझेल इंजिन असून, त्यातून 170 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट होतं. मायलेजच्या बाबतीत ही कार 16.3 किमी प्रति लीटर इतरं मायलेज जनरेट करते. 6 आणि 7 सीटर लेआऊटमध्ये ही कार उपलब्ध असून, बोल्ड डिझाईन आणि कारच्या शेवटच्या रांगेतील आसनव्यवस्थेमध्ये असणाऱ्या सहजतेमुळं ही कार अनेकांच्याच पसंतीस उतरते.






























