Homeमनोरंजनअभिषेक शर्माने युवराज सिंगवर 12 चेंडूत 14 चेंडूत अर्धशतक केल्यानंतर टी-20 क्रिकेटमधील...

अभिषेक शर्माने युवराज सिंगवर 12 चेंडूत 14 चेंडूत अर्धशतक केल्यानंतर टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक


युवराज सिंगवर अभिषेक शर्मा 12 चेंडू टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक: भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने युवराज सिंगचा टी-20 क्रिकेटमधील 12 चेंडूंमध्ये अर्थशतक झळकावण्याच्या विक्रमाबद्दल भाष्य केलं आहे. अभिषेकने स्वत: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये अवघ्या 14 चेंडूंमध्ये भारतात सर्वात जलद अर्थशतक झळकावणारा खेळाडू होण्याचा मान पटकावल्यानंतर युवराजच्या विक्रमकाबद्दल भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे युवराज हाच अभिषेकचा बॅटिंगचे धडे देतो. त्यामुळे आपल्याचा गुरुबद्दल अभिषेक काय म्हणालाय ते पाहूयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सामन्यात घडलं काय?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना रविवारी खेळवण्यात आला. गुवाहाटी येथील बारासापारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 154 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने फक्त 10 षटकांत पूर्ण केले. 154 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मॅट हेन्रीने त्याची विकेट घेतली. मात्र, त्यानंतर इशान किशन फॉर्ममध्ये होता. त्याने 13 चेंडूत 28 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चौथ्या षटकात किशनची विकेट पडली, परंतु तोपर्यंत टीम इंडियाचा स्कोअर 50 च्या पुढे गेला होता.

किशन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने वादळी खेळी केली. त्याने 14 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सातव्या षटकात भारताची धावसंख्या 100 च्या पुढे गेली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने फक्त 25 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि अवघ्या 10 षटकात भारताचा विजय निश्चित केला. सूर्याने 26 चेंडूत नाबाद 57 धावा केल्या, तर अभिषेकने 20 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि पाच षटकार मारले. सूर्याने सहा चौकार आणि तीन षटकारही मारले. भारतीय संघाने हा सामना आठ विकेट्सने जिंकला. यासह भारताने मालिकाही खिशात घातली. भारतीय संघाने पहिले दोन टी-20 सामने जिंकले होते. आता मालिकेत 3-0 ची अभेद्य आघाडी मिळवली आहे.

अभिषेक चमकला

अभिषेकने सुरुवातीपासूनच धडाकेबाज फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने नेहमीप्रमाणे आक्रमक फलंदाजी करत पाच चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने केवळ 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने केलेले हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. तसंच या फॉरमॅटमध्ये एखाद्या भारतीयाने केलेले हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.

युवराजची पोस्ट

अभिषेकने वेगवान अर्थशतक झळकावल्यानंतर युवराज सिंगनेही आपल्या अधिकृत एक्स हॅण्डवलवरुन एक पोस्ट केली. “तरीही 12 चेंडूंमध्ये 50 धावा करता आल्या नाहीत, तुला हे करता येईल का? चांगला खेळलास… अशाच दमदार खेळी करत राहा,” असं युवराजने अभिषेक अर्थशतक साजरा करत असल्याच्या फोटो पोस्ट करत म्हटलं आहे.

युवराजच्या विक्रमाबद्दल काय म्हणाला अभिषेक?

“माझ्या टीमला माझ्याकडून अशाच खेळीची अपेक्षा आहे आणि प्रत्येक वेळी मी ती इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे,” असं अभिषेकने म्हटलं आहे. युवराजचा 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम मोडणं कोणालाही अशक्यच आहे, असं अभिषेकने म्हटलं आहे.  “तो विक्रम मोडणे कोणासाठीही अशक्यच आहे,” असं अभिषेक म्हणाला आहे.

युवराजने कधी केलेली विक्रमी कामगिरी?

युवराजने 2007 साली डर्बनमध्ये इंग्लंडविरुद्ध सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावत 12 चेंडूंमध्ये अर्थशतक झळकावलं होतं. हा विक्रम आज 18 वर्षानंतरही कोणीही मोडू शकलेलं नाही. हा विक्रम कोणी मोडू शकणार नाही असं म्हणत अभिषेकने त्याच्या गुरुचं कौतुक केलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!