Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते संजय...

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊर पोस्ट


भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार संजय राऊत: केंद्र सरकारने रविवारी 2026 सालच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या श्रेणींमध्ये 131 नागरी सन्मानांना मंजुरी दिली आहे. पद्मभूषण जाहीर झालेल्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचाही समावेश आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट शेअर करत संजय राऊतांनी महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते अशी टीका केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

संजय राऊतांनी पोस्टमध्ये काय लिहिलं आहे?

“महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले. याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदेंची पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोस्ट शेअऱ करत मानकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचाही उल्लेख आहे.

“वेगवेगळ्या क्षेत्रांतील आपल्या असामान्य कर्तृत्वाचे आदर्श देशासमोर ठेवणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्वांना भारत सरकारतर्फे गौरविण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांच्या मानकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील थोर अभिनेते-कलावंत धर्मेंद्र यांना मृत्युपश्चात पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करून केंद्र सरकारने त्यांच्या कलाक्षेत्रातील महान योगदानाचा यथोचित गौरव केला आहे. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तसेच गायिका अलका याज्ञिक, कै.पियूष पांडे, उदय कोटक यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तर अमिदा फर्नांडिस (आरोग्य), अशोक खाडे (उद्योग),  भिकल्या लाडक्या धिंडा (कला), जनार्दन बापूराव बोठे (सामाजिक कार्य) जुझेर वासी (विज्ञान), माधवन रंगनाथन (कला), रघुवीर खेडेकर (कला), रोहीत शर्मा (क्रीडा), कै.सतीश शहा (कला), सत्यनारायण नुवाल (उद्योग), श्रीरंग देवबा लाड (शेती) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सन्मानात मानाचा तुरा खोवणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्रांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!