Homeमहाराष्ट्रपुणे पोलिसांनी विमान नगर येथील सिग्नेचर थाई स्पामधून पाच महिलांची सुटका करून...

पुणे पोलिसांनी विमान नगर येथील सिग्नेचर थाई स्पामधून पाच महिलांची सुटका करून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला


पुण्यात सेक्स रॅकेट उघड पुणे पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे शहर पोलिसांनी शनिवारी विमान नगर परिसरात ही कारवाई केली. येथे स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवलं जात होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी ‘सिग्नेचर थाई स्पा’वर छापा टाकून, यावेळी 5 महिलांची सुटका करण्यात आल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी स्पा ऑपरेटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यावेरी स्पामधून रोख रक्कम, बिल बूक, कंडोम आणि इतर गोष्टींसह 38 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

नेमकी काय कारवाई झाली?

पुणे शहर पोलिसांनी शनिवारी विमान नगर परिसरात स्पाच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विमानतळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विमान नगरमधील दत्ता मंदिर चौकाजवळ असलेल्या एका रो-हाऊसमधील ‘सिग्नेचर थाई स्पा’वर दुपारी 4.15 च्या सुमारास छापा टाकला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पाच महिलांची सुटका

पोलिसांनी सांगितलं की, छाप्यात त्यांनी स्पा मधून पाच महिलांची सुटका केली. पोलिसांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्ली येथील रहिवासी असलेल्या या महिलांना देहव्यापारात ढकलण्यात आलं होतं आणि त्या गेल्या काही महिन्यांपासून त्या स्पामध्ये काम करत होत्या.

स्पा चालकाला अटक

विमानतळ पोलीस ठाण्यात पोलिसांनी आसामचा रहिवासी असलेल्या 28 वर्षीय स्पा चालक मेहबूब खान लष्कर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 143 (3) (व्यक्तीची तस्करी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

38 हजारांचा मुद्देमाल जप्त

उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितलं की, छाप्यात रोख रक्कम, दोन पॉइंट-ऑफ-सेल मशीन, स्पाची बिल पुस्तके, कंडोम आणि इतर वस्तू असा एकूण 38 हजार 475 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

“स्पा चालकाला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी स्पा येथे देहविक्री व्यवसायासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याकरिता ऑनलाइन किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत होते. पुढील तपास सुरू आहे,” असं विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी सांगितलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!