डिझेल कार: खासगी वापरासाठी कार खरेदीचा विचार केला जातो तेव्हा तेव्हा काही गोष्टी सहाजिकच केंद्रस्थानी ठेवण्यात येतात. यामध्ये कारचं मायलेज, तिचा परफॉर्मन्स, कारचे फिचर आणि शहरासमवेत गावखेड्यांच्या रस्त्यांवर चालण्याची कारची क्षमता या काहीशा महत्त्वाच्या निकषांचा समावेश असतो. शिवाय हल्ली वाढते रस्ते अपघात पाहता एअरबॅगचा विचारही ग्राहक करतात. सहसा चौकोनी कुटुंब असणाऱ्या मंडळींकडून शहरी वाहतूक आणि वर्षातून दोन- तीनदा गावाकडच्या फेऱ्यांना अनुसरून वाहन खरेदीला प्राधान्य दिलं जातं. अशाच कॉम्पॅक्ट SUV श्रेणीत येणारी एक उत्तम कार कोणती माहितीये?
आकारानं अगदी अवाढव्य वाटणार नाही, मात्र तरीही पुरेसा लेगरूम देणारं केबिन असणारी ही कार म्हणजे किआ सॉनेट (डिझेल व्हेरिएंट). 2 लाख रुपयांच्या अनामत रकमेच्या बळावर ही कार खरेदी केल्यास त्यातून EMI अर्थात महिन्याला किती रुपयांचा हफ्ता येतो माहितीये? Kia कडून Sonet SUV च्या डिझेल लाईनअपमध्ये HTE O Diesel व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॉडेलकी एक्स शोरुम किंमत आहे 9.98 लाख रुपये. कारचा आरटीओ चार्ज, इन्श्युरन्स जोडून ही रक्कम साधारण 10 लाखांच्या घरात जाते.
ईएमआयचं गणित काय?
किआ सॉनेटचं HTE हे डिझेल व्हेरिएंट खरेदी केल्यास एक्स शोरुम किमतीवर फायनान्स अर्थात आर्थिक व्यवहार करावा लागू शकतो. म्हणजेच जर 2 लाखांचं डाऊन पेमेंट केलं, तर तुम्हाला 8.22 लाख रुपये इतक्या किमतीवर कर्ज घ्यावं लागेल. बँकेनं तुम्हाला जर 7 वर्षांसाठी 9 टक्के इतक्या व्याजदरानं कर्ज दिलं, तर प्रतिमहा तुम्हाला 13239 रुपये इतका कर्जाचा हफ्ता पडू शकतो.
सोप्या शब्दांत या कार खरेदीवर तुम्ही 2.89 रुपये इतकी व्याजाची रक्कम देता. जद्यामुळं या कारची एकूण किंमत होते, 13.12 लाख रुपये. तेव्हा कार खरेदी करताना या खर्चाच्या गणिताकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
भारतीय ऑटो क्षेत्रात किआची ही कारी Kia Sonet कॉम्पॅक्ट आकाराच्या एसयुव्ही कारमध्ये एक उत्तम पर्याय असून, या कारची थेट स्पर्धा Mahindra XUV 3XO, Tata Punch, Maruti Brezza, Hyundai Venue अशा एसयुव्ही कारशी आहे. त्यामुळं






























