Homeमनोरंजनयुजवेंद्र चहलचा नवा युजवेंद्र चहलचा Love Connection? मुंबईत ‘या’ अभिनेत्रीबरोबर स्पॉट, चर्चांना...

युजवेंद्र चहलचा नवा युजवेंद्र चहलचा Love Connection? मुंबईत ‘या’ अभिनेत्रीबरोबर स्पॉट, चर्चांना उधाण


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या मैदानावरील कामगिरीपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या चहलने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण आणि प्रभावी राहिली असून, तो संघांसाठी मॅच-विनर ठरला आहे. मात्र अलीकडच्या काळात त्याचं वैयक्तिक आयुष्य सतत चर्चेचा विषय बनलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

२०२५ साली युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा यांनी घटस्फोट घेतला. चार वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असला, तरी घटस्फोटामागील नेमकं कारण त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान धनश्री वर्माने मोठी पोटगी घेतल्याची चर्चा रंगली होती. तसेच घटस्फोट घेण्यापूर्वी चहल आणि धनश्री जवळपास १८ महिन्यांपासून वेगळे राहत असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत वास्तव्यासंदर्भात दोघांमध्ये मतभेद झाल्यामुळे नात्यात तणाव निर्माण झाल्याचंही सांगितलं जात आहे.

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध आरजे महवश यांचं नाव एकमेकांशी जोडलं जाऊ लागलं. दोघे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते. इतकंच नव्हे तर परदेशात एकत्र सुट्टी घालवत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे आरजे महवशमुळेच चहल आणि धनश्री यांच्यातील नातं तुटल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळालं. काही काळ सोशल मीडियावर चहल आणि आरजे महवश लग्नबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.

मात्र या नात्यालाही लवकरच पूर्णविराम मिळाल्याचं चित्र दिसू लागलं. आरजे महवश हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अप्रत्यक्षपणे काही आरोप केले, तर चहलने कोणत्याही वादावर सार्वजनिक प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली. काही दिवसांतच दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं. यानंतर चहल आणि आरजे महवश यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना जोर आला.

याच दरम्यान युजवेंद्र चहल एक्स पत्नी धनश्री वर्मासोबत विमानतळावर एकत्र स्पॉट झाल्याने नव्या चर्चांना उधाण आलं. या भेटीमुळे आरजे महवश आणि चहल यांच्यात मतभेद वाढल्याचा दावा काही माध्यमांकडून करण्यात आला. मात्र याबाबत कोणत्याही संबंधित व्यक्तीकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

आरजे महवशसोबत ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच आता युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो बिग बॉस फेम अभिनेत्री शेफाली बग्गा हिच्यासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाला. दोघे एकत्र दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, चहल आणि शेफाली डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पापाराझींनी पाहताच शेफाली बग्गा काही अंतरावर जाऊन उभी राहिली. तिने कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष करत फोटोसाठी पोझ देण्यास नकार दिला आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेली. तिच्या या वागणुकीमुळे चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

दरम्यान, युजवेंद्र चहलने आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात केल्याचंही बोललं जात आहे. आरजे महवशसोबतचं नातं आता संपुष्टात आल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून, शेफाली बग्गासोबतच्या वाढत्या जवळिकीमुळे चहलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नव्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सर्व घडामोडींवर युजवेंद्र चहल किंवा शेफाली बग्गा यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

यूपीच्या राज्यपाल म्हणाल्या- 13 वर्षांच्या मुलींना वाचवा:याच वयात मासिक पाळी सुरू होते, खरे प्रेम...

0
यूपीच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंगळवारी सांगितले- मी काही बोलले की ते व्हायरल होते. माझ्या बोलण्याचा उद्देश चुकीचा नसतो. तुम्हाला सर्वोत्तम बनवणे हे...

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!