Homeमनोरंजनशूटिंग दरम्यान झालेल्या रेप Attempt ने मराठमोळ्या अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त; 13 वर्षांच्या...

शूटिंग दरम्यान झालेल्या रेप Attempt ने मराठमोळ्या अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त; 13 वर्षांच्या संघर्षानंतर मिळाला न्याय, पण…


अर्चना जोगळेकर: आपण ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहेत ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अर्चना जोगळेकर आहेत. सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी 80 आणि 90चा काळ गाजवला. 1 मार्च 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी मराठीसोबत ओडिया आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण त्यांसोबत एक अशी घटना घडली की त्यांनी करिअरच्या शिखरावर असताना या सिनेसृष्टला रामराम ठोकला. तो प्रसंग कोणत्याही महिलेला अस्वस्थ करेल असा होता.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अर्चना जोगळेकरांची कारकिर्द
अर्चना या उत्तम नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याकाळी त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. अर्चना यांच्या आई आशा जोगळेकर या कथक (Kathak) नृत्यांगना आहेत. त्यांनीच अर्चनाला नृत्याचं प्रशिक्षण दिलं. अर्चना यांच्या आईने मुंबईत अर्चना नृत्यालय या नावाने डान्स स्कूल सुरू केलं. ‘संसार’ या चित्रपटातून अर्चना यांना विशेष ओळख मिळाली. त्यांनी ‘कर्मभूमी’, ‘फूलवंती’, ‘किस्सा शांती का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं.

शूटिंग पूर्ण करुन त्या आत गेल्या अन्… पुढे काय घडलं?
अर्चना यांच्यासोबत घडलेला वाईट प्रसंग खूपच भयानक होता. ओडिशामध्ये एका चित्रपटाचं शूटिंग करत असताना अर्चना यांच्यासोबत अत्यंत वाईट प्रसंग घडला. एका विकृत माणसाने अर्चना यांचा ऑटोग्राफ घेण्याच्या बहाण्याने त्यांच्या ड्रेसिंग रुम मधेय प्रवेश केला. त्यानंतर वेळ साधून त्याने अर्चनावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. अर्चना जोकळेकर थोडक्यात बचावल्या. मात्र त्यांची न्यायाची लढाई तब्बल 13 वर्षे चालली.

18 महिन्यांचा तुरुंगवास अन् 1500 रु दंड
या घटनेनंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली. 1997 मध्ये त्या व्यक्तीला अटक झाली मात्र त्याचा आरोप सिद्ध होण्यासाठी 13 वर्ष निघून गेले. 2010 मध्ये आरोपिला 18 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तर 1500 रुपये दंड ठोठावला.

अर्चना जोगळेकर आत्ता काय करतायेत?
करिअरच्या शिखरावर असतानाच अर्चना यांनी लग्न केलं आणि त्या अमेरिकेला राहायला गेल्या. 1999 मध्ये अर्चना यांनी न्यू जर्सीमध्ये स्वत:ची नृत्यशाळा सुरू केली. परदेशातील विद्यार्थ्यांना त्या शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देतात. ‘नृत्य म्हणजे माझ्यासाठी ऑक्सिजन आहे’, असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. (Marathi Actress)

हे नक्की वाचा: Border 2 Box Office Collection: दणक्यात एन्ट्री करत बिग बजेट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले, पहिल्याच दिवशी केली रग्गड कमाई

अभिनेत्रीच्या खास आवडीनिवडी
अर्चना या सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांना आता दिग्दर्शनाची आवड असल्याचं ते सांगतात. सध्याच्या अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट ही त्यांची आवडती अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली. फक्त अभिनय आणि नृत्यच नाही तर अर्चना उच्चशिक्षितही आहेत. त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!