Homeमहाराष्ट्रशिंदे शिवसेनेतही घराणेशाहीचे राजकारण जिल्हा परिषदेत मराठी बातम्या

शिंदे शिवसेनेतही घराणेशाहीचे राजकारण जिल्हा परिषदेत मराठी बातम्या


शिवसेना घराणेशाही : लोकसभा निवडणुका असो की विधानसभा निवडणुका,बहुतांश नेत्यांना आपल्या कुटुंबातल्याच व्यक्तींना उमेदवारी मिळावी ही अपेक्षा असते. ती नाही मिळाली की सुरु होते नेत्यांची नाराजी.त्यामुळे पक्ष सुद्धा सढळ हस्ते नेत्यांच्या घरात उमेदवाऱ्या देतो.पण आता नेते जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारीसाठी पुढे करतायत. शिंदेंच्या शिवेसनेमध्ये तर याची अनेक उदाहरणं आहेत.त्यामुळे कार्यकर्त्यांनी फक्त हातात झेंडे आणि गळ्यात पक्षाचे गमछे घालून फिरायचं का हा प्रश्न उपस्थित होतोय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

विधानसभा लोकसभा लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांसाठी कार्यकर्ते राबराब राबतात.नेत्यासाठी, पक्षासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात.पालिका, जिल्हा परिषद , पंयायत समितीच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. कारण इथे तरी सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुक प्रक्रियेचा भाग होता येतं, प्रतिनिधीत्व घेता येतं आणि जनतेचा कौल मिळाला तर सत्तेतही सहभागी होता येतं. पण राजकारण्यांची नेत्यांची भूक आता इतकी वाढलीये की इथे सुद्धा ते कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच घरातल्या सदस्यांना पुढे करतायत. कुणी भावा बहिणीला पुढे करतं, कुणी मुला मुलींना, कुणी आई किंवा बायकोला. पण उमेदवारी आपल्याच घरात कशी राहिल याचा पुरेपुर प्रयत्न केला जातो. पालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतही हेच चित्र दिसतंय.. घराणेशाही सर्वच पक्षांमध्ये आहे पण शिंदेंच्या शिवसेनेतच याचा विशेष बोलबाला आहे.

शिवसेनेतली ‘घराणेशाही’

अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सिल्लोडचे नगराध्यक्ष आहेत.दुसरा मुलगा आमेर यांना जिल्हा परिषद उमेदवारी

खासदार संदिपान भुमरेंचे चिरंजीव विलास भामरे आमदार,पुतण्या शिवराज भुमरेंना जिल्हा परिषदेत उमेदवारी

धाराशिवच्या रविंद्र गायकवाडांचे चिरंजीव किरण सध्या उमरग्याचे नगराध्यक्ष तर पत्नी उषा यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी देण्यात आली

माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलीला पंचायत समितीची उमेदवारी

तानाजी सावंतांचा पुतण्या धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेत उमेदवारी

संजय शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी दोघांनाही महापालिकेत उमेदवारी

अर्जुन खोतकरांच्या मुलीलाही जालना महापालिकेत उमेदवारी

आमदार बालाजी कल्याणकरांचे चिरंजीव सुहास यांना नांदेड महापालिकेची उमेदवारी

नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंडेंच्या मुलाला महापालिकेत उमेदवारी

आमदार संतोष बांगर यांच्या भावजय हिंगोलीच्या नगराध्यक्ष

आता ऐरवी सामान्य शिवसैनिकांचा पक्ष असलेल्या शिवसेनेतच फोफावलेल्या या घराणेशाहीबद्दल मात्र मंत्री शिरसाटांना काहीच वाटत नाही. इतरही पक्षात हेच चित्र असल्याचं ते सांगतात. तर शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी मात्र यावर टीका केलीये.

हे झालं शिवसेनेतलं. पण सर्वपक्षांचा आपल्या घराणेशाहीसाठी कसा वापर केला जातो त्याचंही एक उदाहरण आहे. भाजप नेते सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपकडून परभणीत नगरसेवक आहेत.मुलगा समशेर वरपुडकर, सून  प्रेरणा  आणि पुतण्या बोनी हे भाजपकडून जिल्हा परिषदेत उमेदवार आहे तर मुलगी सोनाली शिवसेना युबीटीकडून उमेदवार आहेत तर पुतण्या अनिल वरपुडकर काँग्रेसकडून उमेदवार आहे.म्हणजे पक्ष, कार्यकर्ते राहिले बाजुला पण सगळी पदं आपल्याच कुटुंबात कशी राहतील याची तजवीज महत्वाची.. त्यामुळेच एकाच घरात 6-6 पदं आहेत.

सर्वसामान्यांनाही निवडणूक प्रक्रियेत भाग घेता यावा अश्या पद्धतीने आपल्या लोकशाहीची रचना आहे. पण कार्यकर्त्याचा एकदा का प्रस्थापित नेते झाला की ते आपल्या कुटुंबातल्याच सदस्यांना राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे करतात. पण सामान्य कार्यकर्ता मात्र आयुष्यभर हातात झेंडा घेऊन फक्त प्रचारापुरताच यांना लागतो.आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेते कुटुंबियांनाच पुढे करत असतील तर मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का?





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!