सरफराज खान द्विशतक: भारतीय फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) मागील अनेक दिवसांपासून टीम इंडियात (Team India) स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र दरवेळी त्याला हुलकावणी मिळतेय. आता मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) फलंदाजी करत असलेल्या सरफराजने 206 बॉलमध्ये हैदराबाद विरुद्ध 206 बॉलमध्ये द्विशतक ठोकलं. सरफराजच्या करिअरमधील हे त्याचं पाचवं द्विशतक होतं. सरफराज खान असा पहिला भारतीय आहे ज्याने एकाच सीजनमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक, लिस्ट ए मध्ये 150 आणि टी20 मध्ये शतक ठोकलं.
अशी कामगिरी करणार पहिला भारतीय :
हैदराबाद विरुद्ध खेळताना सरफराज खान 219 बॉलमध्ये 227 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या इनिंग दरम्यान 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले. तिचा स्ट्राईक रेट 103.65 एवढा होता. सरफराजने यापूर्वी जयपूरमधील विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोवाविरुद्ध 157 धावा केल्या होत्या. तसेच लखनऊमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध शतक केले होते. हे त्याचं टी २० क्रिकेटमधील पहिलं शतक होतं. विशेष म्हणजे त्याने आयपीएल ऑक्शनच्या अगदी आधी त्याच्या बॅटमधून हे शतक आले होते.
सरफराज खानच्या आधी डॅनियल बेल ड्रममंडने सर्वात आधी हा कारनामा केला होता. त्याने 2016 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकलं होतं, लिस्ट ए मध्ये 150 आणि टी20 मध्ये शतक ठोकलं होतं. 2017 मध्ये ही कामगिरी करणारा अॅलेक्स हेल्स दुसरा खेळाडू होता. 2023 मध्ये डॅनियल बेल ड्रमंडने ही कामगिरी पुन्हा केली.
हेही वाचा : CSK च्या स्टार फलंदाजाला दुखापत, 14.20 कोटींची लावली होती बोली, आयपीएलला मुकणार?
रणजी ट्रॉफी सामन्यात केली कामगिरी :
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हैदराबादच्या विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या रणजी ट्रॉफी सहाव्या राउंडच्या सामन्यात सरफराजने द्विशतक ठोकले. ज्यामुळे मुंबई संघाने पहिल्या इनिंगमध्ये 560 धावा करून आपली स्थिती मजबूत केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सरफराज खान मुंबईकडून मैदानात उतरला आणि त्याने पुन्हा धमाकेदार कामगिरी केली.
2024 मध्ये खेळला शेवटचा सामना :
सरफराज खानने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वानखेडेवर त्याने शेवटचा टेस्ट सामना खेळला. सप्टेंबर 2025 मध्ये बुची बाबू स्पर्धेत त्याला क्वाड्रिसेप्स दुखापत झाली, ज्यामुळे तो दुलीप ट्रॉफी आणि इंडिया ए मधून बाहेर पडला. मात्र त्यानंतर सरफराज खान फिट झाला आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू लागला. मात्र त्याचा पुन्हा टीम इंडियात समावेश करण्यात येत नाहीये.





























