Homeमनोरंजनदक्षिण आफ्रिका संघात T20 विश्वचषक 2026 मध्ये दोन बदल रायन रिकेल्टन आणि...

दक्षिण आफ्रिका संघात T20 विश्वचषक 2026 मध्ये दोन बदल रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स आले आहेत.


दक्षिण आफ्रिका संघ T20 विश्वचषक 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज टोनी डी जोरजी आणि ऑलराऊंडर डोनोवन फरेरा याना दुखापतीच्या कारणामुळे वर्ल्ड कप संघातून बाहेर जावं लागलं आहे. हे दोघे आता वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांची टी20 सीरिज सुद्धा खेळणार नाहीत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

भारताविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या वनडे सीरिज दरम्यान टोनी डी झोर्झीच्या उजव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले की, डी जोरजीची प्रकृती ही अपेक्षेनुसार नाही आणि तो आगामी टी 20 सीरिजसाठी सुद्धा तंदुरुस्त राहणार नाही. दीर्घ पुनर्वसनाच्या गरजेमुळे त्याला 2026 च्या टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यात आले आहे.

तर ऑलराऊंडर डोनोवन फरेरा याला SA20  लीग दरम्यान गंभीर दुखापत झाली. 17  जानेवारी रोजी जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स सामन्यादरम्यान त्याच्या डाव्या कॉलरबोनमध्ये (हंसली) फ्रॅक्चर झाले, ज्यामुळे तो टी20 मालिका आणि वर्ल्ड कप स्पर्धेतूनही बाहेर पडला. टोनी डी झोर्झी आणि डोनोव्हन फरेरा यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेने टी 20 संघात रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : टी20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार टाकल्याने बांगलादेशला किती आर्थिक नुकसान होणार?

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर देखील दुखापतींशी झुंजत आहे. पार्ल रॉयल्सकडून खेळताना मिलरला स्नायूंना दुखापत झाली होती, ज्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडलाय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेस चाचणीच्या निकालांवर अवलंबून असेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

एडन मार्कराम (उजवीकडे), क्विंटन डी कॉक (wk), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना माफाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश आणि एनरिक नॉर्किया.

दक्षिण आफ्रिकेच्या ग्रुप स्टेज सामन्यांचे वेळापत्रक :

09 फेब्रुवारी – विरुद्ध कॅनडा , अहमदाबाद
11 फेब्रुवारी – विरुद्ध अफगानिस्तान, अहमदाबाद
14 फेब्रुवारी – विरुद्ध न्यूझीलंड , अहमदाबाद
18 फेब्रुवारी – विरुद्ध यूएई, दिल्ली





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!