Homeमनोरंजन...म्हणून साई पल्लवीने बोल्ड कपडे घालणंच सोडलं; स्वतः सांगितली कॉलेजमधील 'ती' संवेदनशील...

…म्हणून साई पल्लवीने बोल्ड कपडे घालणंच सोडलं; स्वतः सांगितली कॉलेजमधील ‘ती’ संवेदनशील घटना


साई पल्लव: साधेपणासाठी ओळखली जाणारी साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी नेहमीच तिच्या पारंपरिक आणि नेचरल लूकमुळे चर्चेत असते. तिला तुम्ही क्वचितच बोल्ड किंवा ग्लॅमरस कपड्यांमध्ये पाहिले असेल. यामागे केवळ फॅशनची निवड नाही, तर तिच्या कॉलेज जीवनात घडलेली एक संवेदनशील घटना कारणीभूत आहे. साई पल्लवीला प्रसिद्धी मिळाल्यानंतरही तिने स्वतःचा ओळख साधेपणा, अभिनय आणि प्रामाणिकपणातूनच जपला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कॉलेजमधील अनुभव
कॉलेजच्या दिवसांत साई पल्लवीने एका डान्स स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेत तिने टँगो डान्स सादर केला होता आणि त्यासाठी थोडी स्लिट असलेली ड्रेस घातली होती. डान्ससाठी तिने खूप मेहनत घेतली होती आणि परफॉर्मन्सवर तिचा पूर्ण फोकस होता.

मात्र, त्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने तो पाहायला सुरुवात केली. डान्स किंवा मेहनतीऐवजी लोक तिच्या कपड्यांवर आणि शरीरावर कमेंट करू लागले. यामुळे साई पल्लवीला मानसिक धक्का बसला.

मनावर झालेला परिणाम
या घटनेनंतर साई पल्लवीला खूप वाईट वाटले. तिला असे जाणवले की लोक तिला कलाकार म्हणून नव्हे, तर केवळ दिसण्याच्या आधारावर पाहत आहेत. तिने एका मुलाखतीत सांगितले की त्या क्षणी तिला स्वतःला ऑब्जेक्टसारखे पाहिले जात असल्याची भावना आली.

या अनुभवाने तिचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. त्यानंतर तिने ठरवले की, भविष्यात अशा कपड्यांपासून ती दूर राहील, ज्यामुळे तिच्या कामाऐवजी दिसण्यावर चर्चा होईल.

चित्रपटांमध्येही बोल्ड लूक नको
कॉलेजमधील त्या घटनेचा परिणाम तिच्या सिने कारकिर्दीवरही झाला. साई पल्लवीने चित्रपट करताना एक ठाम अट ठेवली की ती शॉर्ट ड्रेसेस, रिव्हीलिंग कपडे किंवा अनावश्यक ग्लॅमर स्वीकारणार नाही.

तिच्या मते, प्रेक्षकांनी तिला अभिनय आणि व्यक्तिरेखेमुळे ओळखावे, शरीर किंवा फॅशनमुळे नाही. ती नेहमी म्हणते की साधेपणा हीच तिची खरी ताकद आहे.

नैसर्गिक लूक आणि साधेपणा
साई पल्लवी फक्त कपड्यांमध्येच नाही तर मेकअपच्या बाबतीतही साधेपणा जपते. ती कमीत कमी मेकअप वापरते आणि नैसर्गिक सौंदर्यावर विश्वास ठेवते. तिच्या मते, स्किनकेअर हे मेकअपपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे.

यामुळेच तिचा ऑनस्क्रीन लूक नेहमीच रिअल आणि फ्रेश दिसतो. साई पल्लवी आज अनेक तरुणांसाठी आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहण्याचे प्रेरणास्थान ठरली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नर्मदा उगमस्थान अमरकंटक मंदिराचे सोने-चांदी गायब:ट्रस्टचा दावा- पोलिस ठाण्यात जमा होते; टीआय म्हणाले- माझ्या...

0
आई नर्मदेच्या उगमस्थान असणाऱ्या अमरकंटक येथील उगम मंदिरातील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता झाल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह...

एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीत फिरतात:देशात कायदा शिल्लक आहे की नाही?, डिलिमिटेशन बिलाला...

0
देशात कायदा शिल्लक आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यांवर उघडपणे फिरत आहेत आणि...

दुःखी संताला गुरूंची शिकवण:स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, आपल्या क्षमतेवर विश्वास असेल, तर कठीण ध्येयही...

0
असे म्हणतात की, माणसाचे सुख किंवा दुःख त्याच्या परिस्थितीपेक्षा कमी आणि त्याच्या दृष्टिकोनावर जास्त अवलंबून असते. ही गोष्ट एका लोककथेवरून समजू शकते. फार...

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...
spot_img

24 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना Vs इंग्लंड:दुसरा उपांत्य सामना अटलांटात; मेस्सीचे संपूर्ण स्पर्धेत एकूण...

0
फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोघांमधील दुसरी सेमीफायनल गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
error: Content is protected !!