Homeदेश-विदेशदेवेंद्र फडणवीस दावोस 2026 महाराष्ट्र ड्रीम प्रोजेक्ट इनोव्हेशन सिटी टाटा ग्रुप नवी...

देवेंद्र फडणवीस दावोस 2026 महाराष्ट्र ड्रीम प्रोजेक्ट इनोव्हेशन सिटी टाटा ग्रुप नवी मुंबई एअरपोर्ट AI तंत्रज्ञान नवीनतम अपडेट


दावोस 2026 येथे WEF देवेंद्र फडणवीस : जागतिक दर्जावरील कंपन्या आणि संस्थांच्या प्रमुखपदी असणाऱ्या अनेकांचीच उपस्थिती सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू असणाऱ्या जागतिक आर्थिक परिषद अर्थात ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’ इथं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सध्या दावोसमध्येच असून राज्याच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवत तिथं अनेक महत्त्वाच्या चर्चा आणि उद्योगक्षेत्रासंबंधीच्या चर्चांमध्ये ते सहभागी होत आहेत. राज्यात गुंतवणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेक कंपन्यांसह MOu सुद्धा केले जात आहेत. अतिशय महत्त्वाच्या आणि राज्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक आणण्यास मोलाचा हातभार लावणाऱ्या या WEF मध्ये नुकतीच CM फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

महाराष्ट्राचा स्वप्नवत प्रकल्प…

मुख्यमंत्री फडणवीसांनी महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आणि स्वप्नवत अशा प्रकल्पाची घोषणा नुकतीच दावोस इथं केली. ‘इनोव्हेशन सिटी’ असा हा प्रकल्प असून, यासाठी
(TATA Group) टाटा समूहासोबतचा एक ऐतिहासिक सहकार्य करारही झाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात आलेलं आणि भविष्यासाठी तयार करण्यात येणारं केंद्र महाराष्ट्राला एआय, सेमीकंडक्टर्स आणि जीसीसीच्या केंद्रस्थानी ठेवेल.

एकिकडे तंत्रज्ञान जागतिक अर्थव्यवस्थेला नवा आकार देत असताना, महाराष्ट्रसुद्धा एक जबाबदार, जागतिक स्तरावरील ‘इनोव्हेशन इकोसिस्टम’ तयार करत आहे. ज्याचा थेट फायदा आपल्या लोकांना होईल आणि राज्याचे आर्थिक भविष्य बळकट होईल, अशी हमी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत X अकाऊंटवरून देण्यात आली.

वरील घोषणेपूर्वीच रायगड जिल्ह्यातील पेणचा सर्वांगीण विकास करत या भागाला तिसरी मुंबई म्हणून आकारास आणण्यासाठीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी अनेक कंपन्यांशी करार करत साधारण एक लाख कोटींची गुंतवणूक आल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ही इनोवेशन सिटी. हा प्रकल्प साधारण कोणत्या स्वरुपाचा असेल याचीसुद्धा माहिती अधिकच स्पष्टपणे देण्यासाठी फडणवीसांच्या कार्यालयाकडून एक व्हिडीओसुद्धा शेअर करण्यात आला. साधारण 2 ते अडीच मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये हाय परफॉर्मन्स कम्प्युटींग आणि AI प्लॅटफॉर्म, ह्युमनॉईड्स या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

दावोसमध्ये आणखी काय घडलं?

विविध चर्चा आणि कारारांशिवाय दावोसमध्ये सँडोज स्मॉल मॉलिक्यूल्स अँड अँटी-इन्फेक्टिव्ह्ज ऑपरेशन्सचे ग्लोबल हेड कार्लो गार्गीउलो यांच्यासोबतही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. उच्च-गुणवत्तेच्या, परवडणाऱ्या जेनेरिक आणि बायोसिमिलर औषधांची उपलब्धता वाढविण्यावर ही चर्चा केंद्रित होती. या सहकार्यामुळं राज्याच्या समावेशक आरोग्यसेवा आणि नवोपक्रम-नेतृत्वाखालील वाढीच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देता येणं शक्य होईल असं मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!