Homeदेश-विदेशएका जोडप्याने 65 दिवस लग्न केल्यानंतर 13 वर्षे एकमेकांना कोर्टात खेचले

एका जोडप्याने 65 दिवस लग्न केल्यानंतर 13 वर्षे एकमेकांना कोर्टात खेचले


65 दिवस लग्न, 13 वर्षे भांडण, जोडप्याने 40 केसेस केल्या: लग्नानंतर फक्त 65 दिवसांनी एका जोडप्याने एकमेकाला कोर्टात खेचलं. तब्बल 13 वर्ष दोघांची न्यायालयीन लढाई सुरु होता. यादरम्यान त्यांनी एकमेकांविरोधात 40 खटले दाखल केले. कायदेशीर प्रणालीचा हा ‘असाधारण गैरवापर’ असल्याचे वर्णन करत, सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांना घटस्फोट मंजूर केला आहे. तसंच त्यांना प्रत्येकी 10 हजारांचा दंड ठोठावला आणि दोन्ही पक्षांना एकमेकांविरुद्ध कोणतीही पुढील कायदेशीर कारवाई करण्यापासून रोखले.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सुप्रीम कोर्टाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं की, न्यायव्यवस्थेचे रूपांतर वैयक्तिक हिशोब चुकवण्यासाठीच्या रणांगणात केलं जाऊ शकत नाही. अशा दीर्घकाळ चालणाऱ्या आणि सूडबुद्धीने प्रेरित खटल्यांमुळे आधीच कामाच्या भाराखाली दबलेली न्याय वितरण प्रणाली अधिकच कोलमडून पडते असंही म्हटलं.

हे प्रकरण जानेवारी 2021 मध्ये विवाहबद्द झालेल्या एका जोडप्याशी संबंधित आहे. लग्नानंतर अवघ्या 65 दिवसांतच पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबावर क्रूरतेचा आरोप करून माहेर गाठले. त्यानंतर ते जोडपे वेगळे राहू लागले आणि त्यांचा वैवाहिक वाद कायदेशीर युद्धात बदलला. त्यांचं हे कायदेशीर युद्ध दशकाहून अधिक काळ चाललं.

पती-पत्नीने मिळून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयं, उच्च न्यायालयं आणि इतर न्यायिक मंचांसमोर 40 हून अधिक खटले दाखल केले होते. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान टिप्पणी केली की, हा खटला पूर्णपणे वैयक्तिक शत्रुत्वामुळे प्रेरित होता. “पक्षकार केवळ 65 दिवस एकत्र राहिले आणि गेल्या एका दशकाहून अधिक काळ त्यांनी एकमेकांचा सूड उगवण्याच्या उद्देशाने असंख्य खटले दाखल केले आहेत. हे पाहता, आमच्या मते, त्या दोघांनाही खर्चासह दंड ठोठावला पाहिजे,” असं खंडपीठाने म्हटलं.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत, न्यायालयाने दोघांनाही 10 हजारांचा दंड ठोठावला आणि ही रक्कम सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन’कडे जमा करण्याचे निर्देश दिले. घटनेच्या अनुच्छेद 142 अंतर्गत आपल्या असाधारण अधिकारांचा वापर करून, सर्वोच्च न्यायालयाने विवाह रद्द केला, कारण तो अपरिवर्तनीयपणे संपुष्टात आला होता आणि समेट होण्याची कोणतीही शक्यता नव्हती. न्यायालयीन प्रक्रियेचा पुढील गैरवापर टाळण्यासाठी, न्यायालयाने दोन्ही पक्षांना भविष्यात एकमेकांविरुद्ध कोणतेही खटले दाखल करण्यापासून रोखले आहे.

न्यायालयाने नमूद केलं की, अलीकडच्या वर्षांत उच्च न्यायालयांमध्ये पोहोचणाऱ्या वैवाहिक वादांच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. “हे न्यायालयसुद्धा हस्तांतरण याचिकांनी भरलेले आहे, ज्या मुख्यत्वे पत्नींकडून दाखल केल्या जातात. त्या आपल्या पतींनी सुरू केलेल्या कार्यवाहीचे हस्तांतरण करण्याची मागणी करतात, कदाचित पहिल्यांदाच किंवा प्रत्युत्तर म्हणून,” असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं.

न्यायालयाने पुढे नमूद केलं की, वैवाहिक वादांमध्ये एकदा फौजदारी कारवाई सुरू झाली की, समेट घडवून आणण्याची शक्यता अत्यंत कमी होते. लवकर हस्तक्षेप करण्याच्या गरजेवर जोर देत, खंडपीठाने वैवाहिक संघर्ष सोडवण्यासाठी मध्यस्थीच्या महत्त्वावर अधोरेखित केले.

“जर समेटाचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि असे आढळले की विवाह वाचवण्याच्या पलीकडे पूर्णपणे संपुष्टात आला आहे, तर ही वस्तुस्थिती स्वीकारणे आणि विवाह संपुष्टात आणणे हे संबंधित सर्वांच्या हिताचे आहे, अन्यथा खटला, सर्व पक्षांचे दुःख आणि यातना सुरूच राहू शकतात,” असं खंडपीठाने म्हटलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!