Homeदेश-विदेशदावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आयोजित लीडर्स फोरम पॉवर्ड बाय पोलंड येथे...

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आयोजित लीडर्स फोरम पॉवर्ड बाय पोलंड येथे संभाजी छत्रपती


Sambhaji Chhatrapati At Davos: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच उद्योगमंत्री उदय सामंत हे सध्या दावोसला आहे. दावोसमध्ये ते वर्ल्ड इकनॉमिक फोरमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले असून मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी अनेक अंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत लाखो कोटींचे करार केले आहेत. याचा फायदा महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आणि रोजगार वाढवण्याची होणार असल्याचं सरकराचं म्हणणं आहे. एकीकडे फडणवीस दावोसमध्ये असतानाच दुसरीकडे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे सहकुटुंब दावोस दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजी राजे दाओसमध्ये असण्यामागे एक खास कारण आहे. याबद्दलच जाणून घेऊयात…

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

छत्रपती संभाजी राजे दावोसला का गेलेत?

कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे दावोसला जाण्यामागे कारण ठरलं आहे पोलंडचं निमंत्रण! अनेकांना ठाऊक नसेल पण पोलंड आणि कोल्हापूरचा फार जुना संबंध आहे. छत्रपती घरण्याशी असलेला हे संबंध पोलंडने आजही जपलेत.

छत्रपतींचं पोलंड कनेक्शन

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, हिटलरच्या जर्मनीने पोलंडमध्ये घुसखोरी करत ताबा मिळवला होता. पोलंडचे लोक विस्थापित झाले. 1943 मध्ये पोलंडचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबातील स्त्रीया आणि वृद्धांसोबत भारतात शरणार्थी म्हणून आले होते. त्यापैकी पाच हजार जणांना छत्रपतींनी वाळिवडे, कोल्हापूरात शरण दिली होती. महाराजांनी देशात सर्वात मोठा पोलिश शरणार्थी कॅम्प कोल्हापुरात लावला होता.

हे लोक 1948 पर्यंत तिथे होते आणि बरेच कायमचे तिथेच राहिले. या घटनेच्या स्मरणार्थ कोल्हापूरात 2019 मधे Marcin Przydacz, या पोलैंडच्या परराष्ट्रमंत्री यांच्या हस्ते एका खास स्मृती स्तंभाचं उद्घाटनही करण्यात आलं.

पोलंडमध्ये खास स्मारक

पोलंडनेही कोल्हापूरशी जुळलेल्या नात्याच्या स्मरणार्थ वॉरसॉ येथे ‘माँटे कॅसिआनो वॉर मेमोरिअल’ (Monte Cassino War Memorial, Warsaw) बांधलं आहे. छत्रपती संभाजीराजे 2025 मध्ये  तिथे भेट देऊन आले होते.

छत्रपती संभाजीराजे पोलंडमध्ये का?

पोलंडने  परत 2026 ला दावोसमध्ये छत्रपती संभाजीराजेंना वर्ल्ड इकनॉमिक फोरमसाठी ‘लिडर्स फोरम – पॉवर्ड बाय पोलंड’ (Leaders Forum – Powered by Poland) या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केलेलं.

खर्च भारत किंवा महाराष्ट्र सरकारचा नाही तर…

प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीराजेंना बोलावण्यात आलं होतं. संभाजी महाराज आणि पोलंड सरकार यांच्यात चांगले संबंध आणि मैत्री आहे असं दिसतं. त्यांना निमंत्रण पोलंडकडून आहे याचा अर्थ खर्च पोलंड सरकारचा आहे, असं इंटरनेटवरील चर्चेत नमूद करण्यात आलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना बढती, मीन राशीच्या लोकांना परदेशाशी संबंधित प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता

0
बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी मकर राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना बढती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळू शकते. मीन राशीचे व्यवस्थापनाशी संबंधित लोक परदेशाशी संबंधित...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!