Homeमनोरंजनभारतातील पहिली एक्स-सीटू लिव्हर ऑटो ट्रान्सप्लांट सर्जरी वाडिया हॉस्पिटल यकृत शरीराबाहेर मराठी...

भारतातील पहिली एक्स-सीटू लिव्हर ऑटो ट्रान्सप्लांट सर्जरी वाडिया हॉस्पिटल यकृत शरीराबाहेर मराठी बातम्या


शस्त्रक्रिया: अवघ्या 2 वर्षांच्या अफ्सा हिला गंभीर अशा यकृत कर्करोगाचे निदान झाले होते. यकृताच्या आत आणि भोवतालच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांपर्यंत हा कर्करोग पोहोचल्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया करणे  अशक्य होते. परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये मात्र या बालरुग्णाला आशेचा किरण मिळाला असून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.भारतामध्ये प्रथमच, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अफ्सावर दुर्मीळ आणि अत्यंत गुंतागुंतीची Ex-situ म्हणजेच शरीराबाहेर केली जाणारी शस्त्रक्रिया) यकृत ॲाटो ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

अफ्साच्या आईला अफ्साच्या पोटात सूज जाणवली आणि त्यानंतर तिने त्वरित वैद्यकिय मदत घेत तिची तपासणी करुन घेतली. त्यानंतर ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मुदलियार यांनी अफ्साला गंभीर ‘हेपॅटोब्लास्टोमा’ असल्याचे निदान केले. हेपॅटोब्लास्टोमा हा बालकांमधील सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या यकृत कर्करोगांपैकी एक आहे. मात्र, अफ्साच्या बाबतीत हा कर्करोग यकृताच्या मध्यभागी असल्याने आणि यकृताच्या आत व आजूबाजूच्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरल्याने, शस्त्रक्रिया करणे अत्यंत अवघड आणि जोखमीचे होते.

पारंपरिक शस्त्रक्रियेद्वारे हा कर्करोग समूळ नष्ट करणे शक्य नसल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले. मात्र, चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी नावीन्यपूर्ण Ex-situ यकृत ॲाटो ट्रान्सप्लान्ट लिव्हर सर्जरीचा मार्ग निवडला, ज्याची पुढे वैद्यकीय इतिहासात नोंद झाली.

निदानानंतर, सुरुवातीच्या केमोथेरपीमुळे गाठीचा आकार काही प्रमाणात कमी झाला, परंतु गाठीचे स्थान आणि महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांमध्ये तिचा समावेश असल्यामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. यकृत प्रत्यारोपण हा उपचारांचा सर्वोत्तम पर्याय ठरला असून , केमोथेरपीनंतर कमी कालावधीत दात्याचे (जिवंत किंवा मृत) अवयव उपलब्ध नसल्यामुळे हा पर्याय अशक्य ठरला. केमोथेरपीमुळे गाठीचा आकार कमी झाला असूनही, गाठीने यकृतातून होणारा रक्तप्रवाह पूर्णपणे रोखला होता, ज्यामुळे संपूर्ण यकृत काढून टाकणे आणि रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करणे आवश्यक होते, जे पारंपरिक शस्त्रक्रिया पद्धतींनी शक्य नव्हते.

बाळाचे यकृत आकाराने लहान असून त्याचे वजन सुमारे 500 ग्रॅम होते. त्यामुळे संपूर्ण यकृत कोणतीही हानी न होता शरीराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुर्मिळ एक्स-सिटू (शरीराबाहेरील) शस्त्रक्रिया तंत्रामध्ये रुग्णाच्या शरीरातून संपूर्ण यकृत बाहेर काढण्यात आले, त्यानंतर शरीराबाहेरच  4.5 तास थंड तापमानात ते सुरक्षित केले गेले. यामुळे ट्यूमरने बाधित यकृत काढून टाकण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांची पुनर्रचना करण्याची संधी मिळाल्याचे यकृत प्रत्यारोपण आणि हेपॅटोबिलिअरी शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक माथूर सांगतात.

हे पूर्ण झाल्यावर, पुनर्रचना केलेला उर्वरित निरोगी यकृताचा भाग पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आला. या फायद्यांव्यतिरिक्त, शरीराबाहेर असताना यकृताला होणाऱ्या दुखापतीमुळे या पद्धतीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान आजारपण आणि मृत्यूचे प्रमाणही अधिक असते. हे धोके कमी करण्यासाठी, आम्ही एक्स-सिटू ऑक्सिजनेटेड हायपोथर्मिक मशीन प्रिझर्वेशनचे नवीन तंत्रज्ञान वापरले, जे शरीराबाहेर देखील यकृताला रक्तपुरवठा करते आणि त्याला थंड ठेवते, ज्यामुळे यकृताची दुखापत कमी होते, असे त्यांनी पुढे सांगितले. ही पद्धत यकृताच्या कर्करोगासाठी क्वचितच वापरली जाते, आणि आमच्या सध्याच्या माहितीनुसार, मुलांमध्ये आतापर्यंत ती कधीही वापरलेली नसल्याचेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!