HomeमनोरंजनHealth Care Tips Benefits of Drinking Orange Juice Daily for a Month...

Health Care Tips Benefits of Drinking Orange Juice Daily for a Month | एक महिन्यापर्यंत रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? जाणून थक्क व्हाल!


एक महिना दररोज संत्र्याचा रस पिण्याचे फायदे: भारतातील जास्तीत जास्त लोकांची सकाळ एक कप चहाने सुरू होते. अनेकजण दिवसातून कितीतरी वेळा चहा पित असतात. सतत चहा पिण्याची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास शरीराच्या आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रक्तपेशी तयार करण्यास मदत होते:

चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असते शरीरासाठी हानिकारक मानले जाते. याउलट संत्र्‍यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट आणि पोटॅशियम असते. एक महिन्यापर्यंत तुम्ही रोज संत्र्‍याचा ज्यूस प्यायलात तर, रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. तसेच हिवाळ्यात होणार्‍या सर्दी-खोकल्यापासूनही आराम मिळतो. संत्र्‍यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीरात रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने फक्त शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर,  त्वचेसाठी देखील नुकसानदायक ठरू शकते. यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. पण संत्र्‍याच्या ज्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. त्वचा हायड्रेट राहते आणि व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजन निर्मितीसाठी मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते.

शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते

बऱ्याचदा सकाळी दुधयुक्त चहा प्यायल्याने अनेकांना अ‍ॅसिडीटी होते. संत्र्यामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकून शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करते. चहा प्यायल्याने ताजेपणा तर जाणवतो, पण तो तात्पुताच असतो. याउलट संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास पूर्ण दिवसभर ऊर्जा टिकून राहते. कारण यामध्ये नैसर्गिक साखर असते.

संत्र्याच्या ज्यूसचे अधिक फायदे मिळवण्यासाठी ‘या’ चुका टाळा

1. टेट्राबॉक्स मधील ज्यूस पिणे टाळा. कारण त्यात मोठ्या प्रमाणात रिफाइंड साखरेचा वापर केला जातो. घरच्या घरी ताजे संत्र्याचे ज्यूस तयार करून प्या.

2. संत्र्यामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते जे दाताच्या इनेमलला हानी पोहोचवू शकते. ज्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. ज्यूस प्यायल्यनंतर लगेचच साध्या पाण्याने गुळण्या करा.

3. जर तुम्हाला मधुमेह असेल तर संत्र्याच्या ज्यूस ऐवजी फळ खाणे अधिक फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुम्हाला अधिक फायबर मिळेल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढणार नाही.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी

0
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
spot_img

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...

स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच

0
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...
error: Content is protected !!