आधार कार्ड लॉक आणि अनलॉक वैशिष्ट्य कसे वापरावे: आधार क्रमांक धारक आपली आधार (UID) माहिती UIDAI च्या वेबसाइटवर (www.myaadhaar.uidai.gov.in) किंवा mAadhaar ॲपद्वारे लॉक करू शकतो. असे केल्याने, आधार क्रमांक धारक बायोमेट्रिक्स, डेमोग्राफिक आणि ओटीपी पद्धतींसाठी UID, UID टोकन आणि VID वापरून कोणत्याही प्रकारचे प्रमाणीकरण करू शकणार नाही.
आधार लॉक केल्याने काय होतं?
* जेव्हा तुम्ही तुमचं आधार लॉक करता, तेव्हा ते तुमच्या आधार क्रमांकाचा (UID) वापर करून होणारी प्रमाणीकरण प्रक्रिया तात्पुरती अक्षम करते. याचा अर्थ असा की, विविध सेवांसाठी तुमची ओळख पडताळण्यासाठी संस्था तुमचा आधार क्रमांक वापरू शकत नाहीत.
* तरीही तुम्ही प्रमाणीकरणाच्या उद्देशाने तुमचा व्हर्च्युअल आयडी (VID), जो तुमच्या आधारशी जोडलेला एक तात्पुरता 16-अंकी क्रमांक आहे, वापरू शकता.
आधार लॉक कसं करायचं?
– आधार लॉक करण्यासाठी दोन पद्धती आहेत.
1) UIDAI वेबसाईटचा वापर करा
2) UIDAI च्या वेबसाईटवर जा: https://uidai.gov.in/
3) “My Aadhaar” सेक्शनमध्ये जाऊन “Aadhaar Lock & Unlock” सर्व्हिसवर क्लिक करा.
4) “UID Lock” निवडा आणि त्यात तुमचा UID नंबर, संपूर्ण नाव आणि पीन कोड टाका.
5) तुम्ही एसएमएसद्वारे OTP मिळवण्याचा पर्याय निवडू शकता किंवा mAadhaar ॲपने तयार केलेला टाइम-बेस्ड वन टाइम पासवर्ड (TOTP) वापरू शकता.
6) OTP किंवा TOTP टाका आणि रिक्वेस्ट सबमिट करा
7) यशस्वीपणे लॉक झाल्यानंतर तुम्हाला कंफर्म झाल्याचा मेसेज येईल.
2) mAadhaar App चा वापर करा –
1) गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून mAadhaar ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
2) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ओटीपी वापरून तुमच्या एमआधार (mAadhaar) ॲपमध्ये लॉग इन करा.
* “सेवा” (Services) विभागात जा आणि “आधार लॉक/अनलॉक” (Aadhaar Lock/Unlock) निवडा.
* ‘आधार लॉक करा’ हा पर्याय निवडा आणि स्क्रीनवरील सूचनांचे पालन करा. पडताळणीसाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाकण्याची आवश्यकता भासू शकते.
3) आधार अनलॉक कसं करायचं?
1) युआयडी आधार क्रमांक अनलॉक करण्यासाठी, आधार क्रमांक धारकाकडे नवीनतम 16 अंकी व्हीआयडी (VID) असणं आवश्यक आहे आणि जर आधार क्रमांक धारक 16 अंकी व्हीआयडी विसरला असेल, तर तो एसएमएस सेवेद्वारे नवीन व्हीआयडी मिळवू शकतो.
2) आधार अनलॉक करण्यासाठी, आधार नंबर धारकाने UIDAI च्या वेबसाईटला जावं https://resident.uidai.gov.in/aadhaar-lockunlock
3) अनलॉक रेडिओचा पर्याय निवडा
4) नवीन VID निवडा आणि सेक्युरिटी कोड टाका. ओटीपी किंवा टीओटीपीचा पर्याय निवडून सबमिटवर क्लिक करा
5) तुमचं आधार कार्ड यशस्वीपणे अनलॉक होईल.




























