Homeदेश-विदेशकमालंच झाली! भटकी जनावरं पाळा, महिन्याला 12 हजार मिळवा; शासन निर्णयाची सर्वत्र...

कमालंच झाली! भटकी जनावरं पाळा, महिन्याला 12 हजार मिळवा; शासन निर्णयाची सर्वत्र चर्चा

नवीन सरकारी नियम: मोकाट जनावरांची समस्या सोडवण्यासाठी भारतातील एका राज्य शासनाने एक महत्त्वाचा आणि फायदेशीर निर्णय घेतला आहे. रस्त्यांवर फिरणारी जनावरे, शेतातील पिकांचे नुकसान आणि अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने ग्रामीण भागासाठी दोन नव्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे मोकाट जनावरांना निवारा मिळणार असून, त्यांची काळजी घेणाऱ्या नागरिकांना दरमहा चांगले उत्पन्नही मिळणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

योजनेचा उद्देश आणि गरज

ग्रामीण भागात मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पिकांचे नुकसान, रस्त्यांवरील अपघात आणि जनावरांची खराब अवस्था ही मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने ही योजना राबवली आहे. मोकाट जनावरांना सुरक्षित निवारा, नियमित चारा आणि मोफत आरोग्य सेवा देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. यासोबतच स्थानिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर आहे.

सध्याची व्यवस्था आणि गोशाळा

पिथोरागढ जिल्ह्यात मुनस्यारी आणि बरावे येथे सध्या दोन गोशाळा कार्यरत आहेत. या ठिकाणी सुमारे 225 मोकाट जनावरांची राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय ग्राम गौर सेवक योजनेअंतर्गत अनेक नागरिकांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आपल्या परिसरातील मोकाट जनावरांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे गावांमधील परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे चित्र दिसत आहे.

योजना कशा प्रकारे राबवल्या जातील

पहिली योजना म्हणजे ग्राम गौर सेवक योजना. या योजनेत एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 5 नर मोकाट जनावरांची (वळू किंवा बैल) देखभाल करू शकते. प्रत्येक जनावरासाठी दररोज 80 रुपये मानधन दिले जाणार आहे. यासोबतच या जनावरांना मोफत लसीकरण आणि उपचारांची सुविधा मिळेल. या हिशोबाने एका व्यक्तीला महिन्याला सुमारे 12000 रुपये उत्पन्न मिळू शकते.

दुसरी योजना म्हणजे गोशाळा योजना. या अंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या गोठ्यात किंवा खास गोशाळेत कितीही मोकाट जनावरांना आसरा देऊ शकते. येथेही प्रत्येक जनावरासाठी दिवसाला 80 रुपये दिले जातील. ही योजना मोठ्या प्रमाणावर जनावरांची जबाबदारी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

हे ही वाचा: एकावं ते नवलच! 7.65 रुपये चोरीचा खटला तब्बल 50 वर्षांनी निकाली; पुढे काय घडलं?

ग्रामीण भागासाठी मोठा फायदा

या योजनांमुळे मोकाट जनावरांची समस्या कमी होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांचे नुकसान थांबेल आणि ग्रामीण भागात अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुलेल. सरकारचा हा निर्णय जनावरांच्या कल्याणासोबतच गावकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणारा ठरण्याची शक्यता आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!