Homeदेश-विदेशमोठी बातमी! Air India, Indigo, SpiceJet एअरलाइन्सचा अलर्ट; 'या' ठिकाणची काही उड्डाणे...

मोठी बातमी! Air India, Indigo, SpiceJet एअरलाइन्सचा अलर्ट; ‘या’ ठिकाणची काही उड्डाणे वळवली तर काही रद्द

इराणमध्ये सध्या अराजक माजला असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे इराणमधील परिस्थिती भीतीदायक झाली आहे. त्यामुळे भारतातील एअरलाइन्सने मोठा निर्णय घेतला आहे. इराणमधील बिघडत्या परिस्थितीमुळे विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. भारतीय विमान कंपन्यांनी अलर्ट जारी केला आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट यांनी त्यांच्या एक्स अकाउंटद्वारे प्रवाशांना कळवलं की काही उड्डाणे वळवण्यात येत आहेत, तर काही पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या उड्डाणाची स्थिती तपासावी आणि आवश्यकतेनुसार योग्य ते बदल करावेत.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

एअर इंडियाने काय अर्लट जारी केला आहे?

एअर इंडियाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केलंय की इराणच्या हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, त्यांची उड्डाणे आता पर्यायी मार्गांनी वळवली आहेत. यामुळे उड्डाणांना विलंब होऊ शकतो. ज्या उड्डाणांसाठी सध्या वळवणे शक्य नाही अशा उड्डाणे रद्द करण्यात आल्या आहेत. एअरलाइनने प्रवाशांना एअर इंडियाच्या वेबसाइटवर त्यांच्या उड्डाणाची स्थिती तपासण्याची विनंतीदेखील केली आहे. एअर इंडियाने म्हटलंय की प्रवासी आणि क्रूची सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता असून झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली आहे.

इंडिगोची पोस्ट

इंडिगोने पोस्ट केलं की इराणी हवाई क्षेत्र अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झालाय. एअरलाइनचे पथक परिस्थितीचे मूल्यांकन करत आहेत आणि प्रभावित प्रवाशांना लवचिक री-बुकिंग किंवा परतफेड पर्याय प्रदान केलंय. इंडिगोने असेही म्हटलंय की, ही परिस्थिती एअरलाइनच्या नियंत्रणाबाहेर असून प्रवाशांना सहकार्य करण्याची विनंती केलीय.

स्पाइसजेटकडून प्रवाशांना आवाहन

स्पाइसजेट प्रवाशांना त्यांच्या वेबसाइटवर किंवा 24×7 हेल्पलाइन नंबरवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितला आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने काही फ्लाइटमध्ये बदल होऊ शकतात आणि गरजेनुसार प्रवाशांना पुन्हा बुकिंग किंवा मदत करण्यात येत आहे.

तज्ज्ञ सांगतात की इराणच्या हवाई क्षेत्राच्या नाकाबंदीमुळे भारत ते युरोप, मध्य पूर्व आणि अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. ज्यामुळे विमानला विलंब आणि मार्ग बदल अनेक दिवस सुरु होणार आहे. प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचे आणि एअरलाइन्सद्वारे प्रदान केलेल्या कोणत्याही पुनर्निर्धारण पर्यायांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!