HomeमनोरंजनYoutube 140 Year Mysterious Video Viral on Shinywr Channel No Sound No...

Youtube 140 Year Mysterious Video Viral on Shinywr Channel No Sound No Visuals Internet Mystery Unexplained | ना दृश्य, ना आवाज… रिकामी गूढ स्क्रीन अन् ‘140’ वर्षांचा लांब YouTube व्हिडीओ! लोकही गोंधळात


आवाज नाही नाही व्हिज्युअल इंटरनेट रहस्य अस्पष्ट Youtube व्हिडिओ: यूट्यूबवर सध्या एक विचित्र आणि गूढ व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. ShinyWR नावाच्या चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ तब्बल 140 वर्षांचा असल्याचे थंबनेलवर दिसते. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये ना आवाज आहे, ना कोणतेही दृश्य… तरीही आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. त्यामुळेच हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे. हा व्हिडी ओ पाहायला बसलात, तर प्रत्यक्षात तुम्हाला फक्त एक काळी स्क्रीन दिसते. काहीही ऐकू येत नाही, काहीही घडत नाही. कंटेंट शून्य असतानाही या व्हिडिओवर 29 हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. अनेक युजर्स याला रहस्यमय प्रयोग मानत आहेत, तर काहींना हा केवळ यूट्यूबचा एखादा तांत्रिक टेस्ट वाटतोय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

खरंच 140 वर्षांचा आहे का व्हिडिओ?

व्हिडिओ उघडल्यावर त्याची कालावधी 140 वर्षे दाखवली जाते, पण जसेच प्ले बटण दाबले जाते, तशी ती वेळ अचानक फक्त 12 तासांवर येते. याच गोष्टीमुळे लोक अधिकच गोंधळले आहेत. कोणताही कंटेंट नसलेला असा व्हिडिओ इतका मोठा कसा काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

चॅनेल आणि डिस्क्रिप्शनही संशयास्पद

या व्हिडिओचं वर्णन (डिस्क्रिप्शन) देखील तितकंच गूढ आहे. त्यामध्ये अरबीसारखी दिसणारी अक्षरे वापरण्यात आली असून त्याचा अर्थ “चल, मला नरकात भेट” असा लावला जातो. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, चॅनेलच्या प्रोफाइलनुसार हे चॅनेल उत्तर कोरियातून ऑपरेट होत असल्याचा दावा केला जातो. याशिवाय या चॅनेलवर 294 तासांचे व्हिडिओ आणि जवळपास 300 तासांची लाईव्ह स्ट्रीमही उपलब्ध आहे.

यूट्यूबवर याआधीही असे प्रयोग

हा पहिलाच प्रसंग नाही की यूट्यूबवर विचित्र लांबीचे व्हिडिओ अपलोड झाले आहेत. 2011 मध्ये Jonathan Harchick यांनी तब्बल 596 तासांचा व्हिडिओ अपलोड करून विक्रम केला होता. याशिवाय 23 दिवसांचा व्हिडिओ, किंवा अवघ्या 5 सेकंदांचा व्हिडिओ 19 तासांत शूट करण्याचे प्रयोगही यूट्यूबवर याआधी झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर या 140 वर्षांच्या व्हिडिओबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. इतक्या लांब व्हिडिओवर जाहिराती किती लागतील, त्यातून कमाई किती होईल, की हा सगळा प्रकार केवळ प्रयोग आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ केवळ स्क्रीनवरच नाही, तर लोकांच्या मनातही गूढ निर्माण करत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर FDA ची कारवाई:8 लाखांचा संशयास्पद माल जप्त; सिया केतन अग्रवाल...

0
पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त...

ममता म्हणाल्या- भाजपला वाटते मला हार्ट अटॅक यावा:मी तोपर्यंत जिवंत राहीन, जोपर्यंत त्यांचा अंत...

0
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप वाटते की मला हृदयविकाराचा झटका यावा, पण मी ते संपेपर्यंत जिवंत राहीन. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

15 जुलैचे राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना मुलाखतीत यश मिळेल, मकर राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळण्याची...

0
बुधवार, 15 जुलै रोजी कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना थांबलेले पेमेंट मिळू शकते. मिथुन राशीच्या...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...
spot_img

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...

Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...

0
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
error: Content is protected !!