Homeदेश-विदेशमहाराष्ट्र हवामान बातम्या 14 जानेवारी 2026 थंडीची लाट महाराष्ट्रात पुन्हा धडकेल पुढील...

महाराष्ट्र हवामान बातम्या 14 जानेवारी 2026 थंडीची लाट महाराष्ट्रात पुन्हा धडकेल पुढील 3 दिवस दक्षिण भारतात पावसाचा अंदाज मुंबई पुणे कोल्हापूर ज.के. हिमाचल उत्तराखड

महाराष्ट्र हवामान बातम्या: देशभरात मकर संक्रांतीचं पर्व सुरू असतानाच हवामानातही काही बदल होताना दिसत आहेत. धुक्याची चादर अद्यापही कायम असल्यानं केंद्रीय हवामान विभागानं उत्तरेकडील अनेक राज्यांना कडाक्याच्या थंडीचा इशारा जारी केला आहे. तर, धुक्यामुळं मध्य भारतासह उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अडचणीची परिस्थिती उदभवू शकते असा इशारा लागू करण्यात आला आहे. दरम्यान दक्षिणेकडे होणारी कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करताना दिसत आहे. ज्यामुळं राज्याच तापमानात चढ- उतार होत असून, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये किमान तापमाना काही अंशांनी वाढून पुढील 24 तासांनंतर त्यात पुन्हा एकदा घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार…

मागील 24 तासांमध्ये धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली, जिथं पारा 7 अंशांपर्यंत पोहोचला होता. तर, नागपूर, गोंदिया, यवतमाळमध्ये पारा 11 अंशांवर स्थिरावला होता. पुढील 24 तासांमध्ये या स्थितीत फारसा बदल होणार नसून, राज्याच्या काही भागांमध्ये गारठा कायम राहणार असून, प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका कायम असेल. मात्र राज्यातील कोकण किनारपट्टी, ठाणे, रायगड, पालघर इथं दमट हवामान वाढणार असून, पहाटेचा गारठा वगळता थंडीचा प्रभाव कमी होताना दिसेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळं दक्षिण आणि उत्तरेकडे बदलणाऱ्या हवामानाच्या स्थितीचा राज्यावर संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.

परभणीत रात्री अवकाळी पाऊस, सकाळी थंडी

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील काही भगत रात्री अवकाळणी पावसाच्या सरी कोसळल्या,हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले, सकाळी थंडी दुपारी उन्ह आणि रात्री पाऊस पडल्याने हे वातावरण नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानल जाऊ लागलंय.

देशात पूर्वोत्तर मान्सूनला पूरक स्थिती…

केंद्रीय हवामानाशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं जारी केलेल्या माहितीनुसार देशात सध्या पूर्वोत्तर मान्सूनसाथी पूरक स्थिती निर्माण होत असून, त्यामुळं तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ, माहे आणि लगतच्या किनारपट्टी क्षेत्र, प्रामुख्यानं आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरपासून हिमाचलपर्यंत बर्फवृष्टीचा अंदाज

काहीशा विश्रांतीलनंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तापमानात लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी रात्रीपासूनच काश्मीरच्या खोऱ्यात तापमान घसरलं. पुढील 24 तासांमध्ये या भागात हवा कोरडी राहणार असून, बर्फाच्या पावसाचा अंदाज आहे. तर, हिमाचल प्रदेशात पुढील दोन दिवस पर्वतीय क्षेत्रांना जोरदार हिमवृष्टीचा तडाखा बसण्याचा अंदाज असून चंबासह सात जिल्ह्यांना दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाहौल- स्पितीच्या खोऱ्यात तापमान उणे 9.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्यानं त्याचा परिणाम हिमाचलच्या मैदानी भागांमध्येही पाहायला मिळत आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!