TATA ऑटो कार बातम्या: भारतातील अग्रगण्य कार कंपन्यांपैकी एक असणारी कंपनी म्हणजे टाटा. TATA कंपनीच्या कार म्हटलं की प्रथमत: उच्चारली जाते ती म्हणजे विश्वासार्हता. त्यातही भारतीयांची कार चालवण्याची एकंदर शैली पाहता टाटा मोटर्सनं कायमच ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत त्याच अनुषंगानं कारचे विविध मॉडेल डिझाईन केले. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला तो म्हणजे या कारच्या किमती. या कंपनीनं ग्राहकांच्या अर्थार्जनाला अनुसरून मध्यमवर्गीयांनासुद्धा परवडेल अशा कार लाँच केल्या. ज्यामध्ये आता TATA Punch च्या नव्या मॉडेलचीसुद्धा भर पडली आहे.
टाटा पंच फेसलिफ्ट कार अखेर लाँच…
टाटा मोटर्सनं भारतात अखेर टाटा पंच फेसलिफ्सट (Tata Punch Facelift) ही कार अधिकृतपणे लाँच केली आहे. अधिकृत बी-एसयुवी असणाऱ्या या कारची किंमत मध्यमवर्गीयांना परवडणारी असून, 5.59 लाख रुपये अर्थात 6 लाखांहून कमी निर्धारित करण्यात आली आहे. या कारचं टॉप व्हेरिएंट 9.29 लाख रुपये (एक्स शोरुम) रुपयांना उपलब्ध आहे. किमतीतील बदलाशिवाय कारचे फिचरही अपर्गेड करण्यात आले आहेत.
कारमध्ये कोणते नवे बदल?
टाटा पंचच्या फेसलिफ्ट अपग्रेडमध्ये बरेच बदल करण्यात आले असून, इंटेरिअर फिचरमध्ये 360 डिग्री कॅमेरा, पॅडल शिफ्टर्स, 6 एयरबॅग, आयसोफ़िक्स, रेन सेंसिंग वायपर्स, वायरलेस स्मार्टफ़ोन चार्जर, आयआरए कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, 3-पॉइंट सीटबेल्ट रिमाइंडर, वॉइस-असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटो-डिमिंग आईआरवीएम, कॉर्नरिंग फंक्शनसह एलईडी फॉग लॅम्प्स, 10.25-इंच टचस्क्रीन, इक्सटेंडेड थाई सपोर्ट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, टाइप-सी चार्जिंग पोर्ट्स, वायरलेस अॅप्पल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, टीपीएमएस आणि ड्राइव मोड्स देण्यात आले आहेत.
2026 टाटा पंच फेसलिफ्ट आले आहे
₹5.59 लाख पासून सुरू होते (प्रास्ताविक)
नवीन 1.2L टर्बो-पेट्रोल इंजिन
iTurbo साठी 6-spd MT
पंच सीएनजीसाठी पॅडलशिफ्टर्ससह एएमटी
5-स्टार भारत NCAP रेटिंग
iTurbo रेंज ₹8.29 लाख पासून सुरू होतेपहिले विचार? pic.twitter.com/XaMXmYu2nA
— carandbike (@carandbike) 13 जानेवारी 2026
कारची एक्स शोरुम किंमत ही सुखावणारी असतानाच या कारचं इंजिन आणि त्याची ताकदसुद्धा एक उत्तम आणि बजेट एसयुव्ही कशी असावी हेच सिद्ध करत आहे. अधिकृत माहितीनुसार नव्या टाटा पंच फेसलिफ्टमध्ये आता 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आलं असून, त्यातून 118bhp पॉवर आणि 170Nm इतका टॉर्क जनरेट होतो. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी ही कार जोडण्यात आली असून, त्यामध्ये 1.2 लीटर नच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मॉडेलची विक्रीसुद्धा सुरूच राहणार आहे. 366 लीटर इतका बूटस्पेस देणारी ही कार एका लहान कुटुंबासाठी उत्तम पर्याय आहे.





























