HomeमनोरंजनFruits For People With Diabetes Healthy Or Not | मधुमेह असणाऱ्यांनी फळे...

Fruits For People With Diabetes Healthy Or Not | मधुमेह असणाऱ्यांनी फळे खावीत का? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या अचूक उत्तर


मधुमेह असलेल्या लोकांसाठी फळे निरोगी आहेत की नाही?: आजकाल मधुमेह टाळण्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून साखर वर्ज करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. पण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात रहावी किंवा एक निरोगी आहार म्हणून फळांचे सेवन केले जाते. साखर, मिठाई, चॉकलेट यांपासून दूर राहणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी त्याऐवजी गोड म्हणून फळे खाणे अडचणीत टाकू शकते. तज्ज्ञांच्या मते, फळे आरोग्यदायी असली तरी ती जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रिफाइंड साखर टाळण्यासाठी आहारात गोड फळांचा समावेश करावा का?

बहुतेक फळांमध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असते. केळी, आंबा, द्राक्षं, चिकू, सीताफळ यांसारख्या गोड फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. विशेषतः मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रिफाइंड साखर टाळण्यासाठी गोड फळांचे सेवन करणे हा एक आरोग्यदायी पण धोकादायक निर्णय असू शकतो. पण तुम्ही गोड फळांचे सेवन योग्य त्या प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरू शकते.

फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी असते का?

याशिवाय अनेकजण फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी समजतात. मात्र जेव्हा फळांचा रस बनवताना फक्त रस उपयोगात आणला जातो आणि फळांचा चोथा फेकून दिला जातो. सफरचंद, संत्रे, चिकू, पेरू अशा अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पोटाच्या आरोग्यासाठी तसेच संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. फळांच्या रसामध्ये साल नसल्याने त्यात फायबर नसून फक्त साखर असते. ही साखर थेट रक्तात जाते. त्यामुळे अनेक जणांनी त्यांच्या आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केली असली तरी त्यांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते.

फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर एक वाटी फळे खाणे योग्य मानले जाते. रात्री उशिरा किंवा सतत फळे खात राहणे टाळायला हवे. तसेच, फळांसोबत काही प्रमाणात ड्रायफ्रूट्स घेतल्यास शुगर नियंत्रित राहते. पण सतत किंवा फक्त फळे खाणे टाळायला हवे. तसेच तुम्हाला डाएट किंवा उत्तम आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करायचा असेल तर अनुभवी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा

0
राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत...

गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!

0
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...

आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...

0
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!