Homeसांस्कृतिकमकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोरन्हाण का घालतात? काय आहे प्रथा...

मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत लहान मुलांचं बोरन्हाण का घालतात? काय आहे प्रथा आणि कसं करतात? सर्व माहिती एका क्लिकवर


मकर संक्रांती 2026: मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असून तो देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात मकर संक्रांत साजरी करण्याची वेगळी परंपरा आहे. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला विवाहित महिला सुगड पूजा करतात. तसंच रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू सोहळ्याचं आयोजन करतात. ज्या लग्नानंतर विवाहित जोडप्याचा मकर संक्रांती सण हा तिळवा म्हणून साजरा करण्यात येतो. तर लहान मुलांचं बोरन्हाण घालण्यात येतं. तुमच्या घरातही 5 वर्षांपर्यंत मुलं असेल तर मकर संक्रांतीला बोरन्हाण घालण्याची प्रथा असेल, तर जाणून घ्या या प्रथेमागील कारण आणि कसं घालतात बोरन्हाण?

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

बोऱ्हा का करू?

महाराष्ट्रात मकर संक्रांतीत लहान मुलांचा कौतुकाचा संस्कार म्हणून बोरन्हाण घातलं जातं. यात 1 ते 5  वर्षांपर्यंतच्या मुलांच्या डोक्यावरून बोरं, ऊस, शेंगा, मुरमुरे, बत्तासे, बिस्किट आणि चॉकलेट खाली टाकलं जातं. हे सगळं साहित्य लहान मुलं गोळ्या करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भात याला लूट असंही म्हटलं जातं.

बोरन्हाण करण्यामागे कारणं म्हणजे थंडीच्या दिवसात मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांना आरोग्य लाभावं म्हणून केलं जातं. तसंच सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक मानलं जातं. या सोहळ्याच्या वेळी लहान मुलांनाही काळे कपडे परिधान करुन हलव्याचे दागिने घातले जातात. हा शिशूसंस्कार मुलांच्या जन्मापासून वयाच्या 5 वर्षांपर्यंत मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत केला जातो.

बोरन्हाण सोहळ्यामागे धर्मशास्त्रात काय आख्यायिका?

धर्मशास्त्रात या बोरन्हाण प्रथेमागे एक आख्यायिका सांगण्यात आली आहे. ही कथा अशी आहे की, करी नावाचा राक्षस होता. या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून ही प्रथा केली जाते. पौराणिक काळात बोरन्हाण बाळ गोपाळाची करण्यात आली होती. लहान मुलांनाही बाळगोपाळाचे रुप मानलं जातं. त्यामुळे राक्षसापासून लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी ही प्रथा आजही पाळली जाते.

बोरन्हाण करण्यासाठी काय काय लागतं?

औक्षणासाठी हळद-कुंकू, तुपाचे निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता आणि कापूस. लहान मुलांसाठी काळा फ्रॉक किंवा काळा कुर्ता आणि हलव्याचे दागिने. तसंच बोरं, ऊस, शेंगा, मुरमुरे, बत्तासे, बिस्किट आणि चॉकलेट आणा.

असं करा बोरन्हाण?

या सोहळ्यासाठी घरातील आणि आजूबाजूच्या लहान मुलांना बोलवा. पाट किंवा चौरंगावर नवीन काळे कपडे घालून लहान मुलाला बसवा. त्यानंतर त्यांचं औक्षवान करा. मग त्यांच्या डोक्यावरून बोरं, ऊस, शेंगा, मुरमुरे, बत्तासे, बिस्किट आणि चॉकलेट घाला. त्यावेळी लहान मुलांना हे साहित्य लुटण्यास सांगा. शिवाय हे साहित्य टाकताना म्हणा की, बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे. तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे हा सोहळा करताना लहान मुलांना इजा होऊ नये म्हणून काळजी घ्या.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!