Homeमनोरंजनविजय हजारे ट्रॉफी दरम्यान टिळक वर्मा शस्त्रक्रिया अद्यतने न्यूझीलंड मालिका गमावण्याची शक्यता

विजय हजारे ट्रॉफी दरम्यान टिळक वर्मा शस्त्रक्रिया अद्यतने न्यूझीलंड मालिका गमावण्याची शक्यता


Tilak Verma Health Updates: टीम इंडियाचा स्टार युवा क्रिकेटर तिलक वर्मा (Tilak Verma) याचं ऑपरेशन करण्यात आलं आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार तिलक वर्मा यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी 20 सीरिजमधून बाहेर पडला आहे. 21 जानेवारी पासून टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. संबंधित याबाबतीत बीसीसीआयने (BCCI) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र तिलक वर्माच्या तब्येतीमुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

तिलक वर्माला नेमकं काय झालं?

टेस्टिकुलर टॉर्शनच्या समस्येमुळे 7 जानेवारीच्या सकाळी राजकोट येथे नाश्ता केल्यावर तिलक वर्माला शरीराच्या खालच्या भागाला अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. जिथे तपासणी केल्यावर त्याचं ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी तिलक वर्मा हा विजय हजारे ट्रॉफीसाठी हैदराबाद संघासोबत राजकोट येथे होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने PTI ला सांगितलं तिलक वर्मा वेदनेत असताना त्याला लगेचच गोकुळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. चाचण्या आणि स्कॅनमधून असे दिसून आले की तिलकला टेस्टिक्युलर टॉर्शन आहे, ही अशी स्थिती आहे जी अचानक, तीव्र वेदनांमुळे होते. डॉक्टरांनी तिलकला विलंब न करता ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला.

आता कशी आहे तिलकची तब्येत?

तिलक वर्माचं ऑपरेशन यशस्वी झालं असून तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आणि त्यांनी निर्णयाला सहमती दर्शवली अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.  तिलक वर्माची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता त्यांची प्रकृती चांगली आहे. ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय पॅनेलशी चर्चा केल्यानंतर, तिलक यांच्या प्रकृतीत सुधारणा आणि मैदानात परतण्या संदर्भात संभाव्य माहिती मिळताच, ती शेअर केली जाईल.

हेही वाचा : क्रिकेटच्या मैदानावर उतरणार बॉलिवूड, हनी सिंह सोबत ‘या’ अभिनेत्री करणार परफॉर्म, कुठे पाहाल Live?

वर्ल्ड कप सामान्यांना सुद्धा मुकणार तिलक?

21 जानेवारी पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांची ही सीरिज तिलक वर्मा ऑपरेशन झाल्यामुळे मुकू शकतो. ही सीरिज आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 पूर्वीची तयारी असणार आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारी पासून टी 20 वर्ल्ड कप 2026 ला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना हा यूएसए विरुद्ध होईल. मात्र तिलक वर्मा हा सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (मदत), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (समर्थक), इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हरिशिंगटन, सनदीन सिंह, सनदीन सिंह, रवींद्र सिंह.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!