HomeमनोरंजनHeadache back pain skin irritation Early Signs Of Cancer | तुमच्याही शरीरात...

Headache back pain skin irritation Early Signs Of Cancer | तुमच्याही शरीरात ‘हे’ बदल दिसतायत? असू शकतात कर्करोगाचे संकेत, आत्ताच सावध व्हा!


जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत: कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्याचे नाव ऐकताच सर्वांच्या कपाळावर आठ्या पडतात. एका संशोधनानुसार, कर्करोगामुळे जगभरात दररोज सुमारे 26,000 पेक्षा जास्त लोक मृत्यू मुखी पडतात. कर्करोग झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यभर मृत्यूशी झुंज द्यावी लागते. कर्करोगाची लक्षणे लगेच दिसून येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचवेळा उपचारासाठी उशीर होतो आणि आरोग्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीरात होणारे काही सामान्य बदल कर्करोगाचे संकेत देत असतात. पण याबाबत योग्य माहीती नसल्याने दुर्लक्ष केले जाते. तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत असे घडू नये यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. सदर लेखात याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

वजनात अचानक घट होणे

बऱ्याचवेळा व्यायाम आणि डाएटिंग न करताही अचानक वजनात घट होते. कामाची व्यस्थता, धावपळ, खाण्याच्या वेळांची अनियमितता यामुळे वजनात अचानक घट होत आहे. असे मानून याकडे दुर्लक्ष केले जाते. पण शरीरात होणारा हा बदल कर्करोगाच्या सुरूवातीचा मोठा बदल आहे. जर 1 किंवा 3 महिन्यात तुमचे वजन 4 ते 5 किलो पर्यंत अचानक कमी झाले तर, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. हे फु्फ्फुसांच्या कर्करोगाचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.

सतत जास्त प्रमाणात थकवा येणे

दिवसभर काम आणि धावपळ केल्याने थकवा येणे हे सामान्य मानले जाऊ शकते. पण योग्य प्रमाणात झोप आणि आवश्यक आहार घेऊनही तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर, सावध व्हा. कारण, कर्करोगाच्या सुरुवातीला सतत थकवा येणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अशी सामान्य पण गंभीर समस्या उद्भवतात. हे पोटाच्या किंवा रक्ताच्या कर्करोगाचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.

सतत अंगदुखी असणे

तुम्हाला रोज अंगदुखी जाणवत असेल, तसेच डोके दुखी जाणवत असेल तर हे देखील कर्करोगाच्या सुरूवातीची लक्षणे असू शकतात. विशेषतः तुम्हाला सतत डोके दुखी जाणवत असेल तर, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण सततच्या सामान्य डोके दुखीचे रूपांतर मायग्रेनमध्ये होऊन ते ब्रेन ट्यूमरचे मोठे कारण बनू शकते. तसेच रोजची पाठदुखी पुढे गंभीर स्वरूप घेऊन कोलोन किंवा प्रोस्टेट कर्करोगाला आमंत्रण देऊ शकते.

सतत ताप येणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते ताप तेव्हा येतो जेव्हा आपले शरीर एखाद्या अंतर्गत इन्फेक्शनशी लढत असते. जसे की, सर्दी-खोकला झाल्यावर ताप येणे सामान्य मानले जाते. पण तुम्हाला सतत ताप येत असेल तर, हे रक्ताच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

त्वचेवर होणारे परिणाम

त्वचेचा रंग गडद किंवा पिवळसर होणे, डोळ्यांचा रंगही पिवळसर दिसणे, त्वचेला खाज सुटणे किंवा लाल चट्टे येणे. ही लक्षणे देखील सामान्य असली तरीही त्वचेच्या कर्करोगाची सुरूवात असू शकते.

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला वरील लक्षणे जाणवत असतील तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि कर्करोगापासून त्यांचा बचाव व्हावा यासाठी ही बातमी नक्कीच शेअर करा.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...

0
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...
spot_img

मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...

0
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...
error: Content is protected !!