Homeमहाराष्ट्र99 वर्षे जुना महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त पक्ष भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची स्थापना...

99 वर्षे जुना महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त पक्ष भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची स्थापना केव्हा झाली या सर्व तारखा पाहून तुम्हाला धक्का बसेल


एमआयएम महाराष्ट्र वाद महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. युती आणि आघाड्यांच्या राजकारणात कधी काय घडेल, याचा नेम नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कट्टर विरोधी पक्षसुद्धा सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, याचे जिवंत उदाहरण अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत पाहायला मिळालं. पार्टी विथ डिफरंस’ अशी ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी सारीच तत्व गुंडाळून ठेवलीत का?, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय, कारण अकोल्यातील अकोट नगरपालिकेत सत्तेसाठी भाजपनं थेट एमआयएमसोबत युती केली आहे. वादानंतर अवघ्या काही तासांत तुटली पण MIM पक्षाची चर्चा काही थांबली नाही. MIM पक्ष हा महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त पक्ष असून तो 99 वर्षांपूर्वी स्थापन झालाय.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

99 वर्षांपूर्वी स्थापन झाला MIM

एमआयएम (AIMIM) पक्षाची स्थापना 1927 मध्ये झाली. AIMIM अर्थात मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या नावाने हा पक्ष स्थापन करण्यात आला. हैदराबाद येथे नवाब बहादूर यार जंग आणि नवाब महमूद नवाज खान किलेदार यांनी या पक्षाची स्थापना केली. मुस्लिमांचा सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करणे या उद्देशाने हा पक्ष स्थापन करण्यात आला होता. सुरुवातीला हा पक्ष ‘मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM)’ म्हणून ओळखला जात होता आणि नंतर तो ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) म्हणून विकसित झाला.  हैदराबादमध्ये मुख्यालय असलेला हा पक्ष सध्या असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर त्यांचे वर्चस्व आहे.

शिवसेने पक्ष भाजपच्या आधी स्थापन झालाय

शिवसेना पक्षाचे सध्या दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. 19 जून 1966 रोजी हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी भारतातील एक राष्ट्रवादी राजकीय पक्ष म्हणून स्थापना केली.

भाजप पक्ष कसा स्थापन झाला

भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोन जागा जिंकणारा भाजप आज केंद्रात स्वबळावर बहुमताने राज्य करत आहे. केवळ 3 मतांमुळे बहुमताच्या सरकारमधून वाजपेयी आणि अडवाणी यांना बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसानंतर भाजपची स्थापना झाली.

60 वर्ष भारतात सत्तेत असलेला पक्ष

28 डिसेंबर 1885 ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने केली होती काँग्रेसची स्थापना.  काँग्रेस देशातील पहिला आणि मोठा राजयकीय पक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ देशात याच पक्षाचे सरकार होते. देशाचे संविधान तयार करण्यापासून ते देशातील प्रत्येक व्यवस्थेत काँग्रेसची छाप असल्याचे दिसून येते. देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे नेते, ते स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असोत की स्वातंत्र्यानंतर, सर्वांचे राजकीय मूळ काँग्रेसशी निगडित होते. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल किंवा सुभाष चंद्र बोस आणि इतर मोठ्या नेत्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात याच काँग्रेसमधून केली होती.

राष्ट्रवादी पक्ष कसा स्थापन झाला

10 जून 1999 रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.  1999 मध्ये सोनिया गांधींऩा काँग्रेस अध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अनवर यांनी विरोध केला. त्यामुळे तिघांनाही पक्षातून काढून टाकण्यात आले आणि त्यांनी मिळून 25 मे 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  सुरू केली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!