Homeदेश-विदेशभारतीय रेल्वे 10वी पाससाठी सर्वात मोठी भरती, पगार तपशील जाणून घ्या मराठी...

भारतीय रेल्वे 10वी पाससाठी सर्वात मोठी भरती, पगार तपशील जाणून घ्या मराठी बातम्या

10वी पास साठी रेल्वे नोकरी: फक्त दहावी उत्तीर्ण असल्याने चांगली नोकरी मिळणार नाही, असा अनेकांचा समज असतो. पण आता हा केवळ गैरसमज ठरु शकतो. तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

रेल्वे भरती मंडळ म्हणजेच आरआरबीमार्फत भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी लेव्हल-1 साठी जवळपास 22 हजार जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. यात ट्रॅक मेंटेनर ग्रेड-4, पॉइंट्समन, सहाय्यक आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अशा विविध विभागांतील तांत्रिक पदांचा समावेश आहे. ही संधी दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी आहे.त्यामुळे या तरुणांना रेल्वेत स्थिर नोकरी मिळू शकणार आहे.

पात्रता निकष

उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तांत्रिक विभागांसाठी आयटीआय किंवा एनएसी प्रमाणपत्र असल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे. ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षांची सूट मिळते. इतर सरकारी नियमांनुसार आणखी सूट लागू होईल.

अर्ज शुल्क

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क आहे, पण संगणक आधारित परीक्षेला हजर राहिल्यास 400 रुपये परत मिळतील. एससी, एसटी, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 250 रुपये शुल्क आहे. ही रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

निवड प्रक्रिया

निवड चार टप्प्यात होणार आहे. प्रथम संगणक आधारित परीक्षा (सीबीटी), नंतर शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी. प्रत्येक टप्प्यात यश मिळवणे गरजेचे आहे. सीबीटीमध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान असे विषय येतील, तर पीईटीमध्ये शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाईल, याची नोंद घ्या.

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज 21 जानेवारी 2026 पासून सुरू होतील आणि 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत करता येतील. अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जा, नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा, वैयक्तिक माहिती भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज वेळेवर करणे महत्त्वाचे आहे. कारण उशीर झाल्यास संधी हुकू शकते, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पगार आणि इतर फायदे

निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल-1 चे मूलभूत वेतन 18 हजार रुपये मिळेल. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि रेल्वेचे इतर विशेष भत्ते जोडले जातील. ही नोकरी सुरक्षित आणि चांगल्या सुविधांची आहे. ज्यात पेन्शनसारखे फायदेही आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!