Homeदेश-विदेश'छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते'; मुक्ताफळं उधळणाऱ्या या मंत्रीमहोदयांचं नाव...

‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते’; मुक्ताफळं उधळणाऱ्या या मंत्रीमहोदयांचं नाव काय? राऊतांचाही हल्लाबोल…

भाजप नेते सीआर पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य : छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रासाठी प्रचंड अभिमान, प्रेरणास्त्रोत आणि वंदनीय असणारे हे रयतेचे राजे. राज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय म्हणजे महाराज. मात्र याच महाराजांबाबत नुकतंच एका भाजप नेत्यानं त्याहूनही केंद्रात मंत्रीपदावर असणाऱ्या नेत्यानं असं काही वक्तव्य केलं आहे की आता महाराष्ट्रातून नेतेमंडळी आणि सामान्यांनीही या मुक्ताफळं उधळणाऱ्या मंत्र्यांबाबत नाराजीचा सूर आळवला आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोण आहेत हे मंत्री? ते काय म्हणाले?

केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपामधील मोठे नेते अशी ओळख असणाऱ्या सीआर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते’, असे वक्तव्य सी.आर पाटील यांनी केलं आहे. सुरतमध्ये आयोजित पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात सध्या 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलेल्या या विधानाचे राज्यातील निवडणूक प्रचारात जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

‘मला सांगताना आनंद होतोय की, छत्रपती शिवाजी महाराजही पाटीदार समाजाचे होते आणि त्यांनीही हिंदू स्वराज्याची स्थापना करण्याचे यशस्वी प्रयत्न केले’, असं पाटील म्हणाले. इतिहास अभ्यास संजय सोनवणी यांनी पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना झी 24तासशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, ‘हे विधान राजकीय हेतूनं केलं असून, हा एक अत्यंत केविवाणा प्रयत्न असून, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या समाजाचे, जातीचे आणि धर्माचे होते असा विचार करण्याचा मूर्खपणाच आहे. शिवाजी महाराज सर्वांचे होते. मात्र इतिहास सांगतो की ते मराठा होते. त्यांनी अनेक पत्रांमध्ये तसा उल्लेख केला आहे. हे स्पष्ट असताना आणि इतिहास स्पष्ट असताना या मंडळींनी इतिहासाचं वाचन करण्याची गरज आहे. नाहीतर महापुरुषांबद्दल अशी बेधडक वक्तव्य करण्याचं धाडस त्यांनी केलं नसतं.’

दरम्यान, सीआर पाटलांच्या वक्तव्याने नवं राजकीय घमासान सुरु झालं असून, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरु आहे’, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.  तर, संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षाचा नेता असं वक्तव्य करत असेल तर हे निषेधार्थच आहे अशी प्रतिक्रिया दिली. ‘मुळात छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर त्यांना महाराष्ट्रात येऊन गडकोट फिरावे लागतील आणि मग ते कोणत्या समाजाचे होते, काय समाजाचे होते ते बोलावं. महाराजांचा इतिहास आयुष्यात आत्मसात करायचा नाही, त्यांच्यासारखं काम करायचं नाही हा या लोकांटा कुचकामीपणा आहे’, असं ते म्हणाले.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!