Homeदेश-विदेशIndias economy will grow by 2047 Report claims per capita income marathi...

Indias economy will grow by 2047 Report claims per capita income marathi news | 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट, किती होईल दरडोई उत्पन्न?

भारताची अर्थव्यवस्था: भारताची अर्थव्यवस्था पुढील 21 वर्षांत म्हणजे 2047 पर्यंत सध्याच्या 4.18 ट्रिलियन डॉलरवरून 26 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. ही वाढ सुमारे 5.25 पट इतकी असेल. यामुळे भारत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. ही प्रगती युवा लोकसंख्या, डिजिटल क्रांती आणि उत्पादन क्षेत्रातील मजबुतीमुळे शक्य होईल, असे सांगण्यात येत आहे. अर्न्स्ट अँड यंग (EY) या नामवंत संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

दरडोई उत्पन्नात मोठी वाढ

सध्याचे दरडोई वार्षिक उत्पन्न अंदाजे 2.5 लाख रुपये आहे ते 2047 पर्यंत 13.5 लाख रुपयांपर्यंत वाढेल. ही वाढ जवळपास साडेपाच पट असेल. याचा अर्थ सामान्य नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल. अधिक रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. ही प्रगती स्थिर 6 टक्के विकास दरानेही शक्य आहे, असे अर्न्स्ट अँड यंगचे म्हणणे आहे.

युवा कामगारांची ताकद

भारताची तरुण लोकसंख्या हा सर्वात मोठा फायदा आहे. 2030 पर्यंत 15 ते 64 वयोगटातील लोकांची टक्केवारी 68.9 टक्के होईल, म्हणजे सुमारे 100 कोटी कामकाजी लोक होतील. जगातील नवीन कामगारांपैकी 24-25 टक्के भारतातून येतील. सरासरी वय फक्त 28.4 वर्षे असल्याने हे तरुण देशाच्या विकासाला गती देतील.

नवउद्योजकता आणि स्टार्टअपची भरारी

देशात 107 युनिकॉर्न कंपन्या आहेत, ज्यांची एकूण किंमत 7.37 लाख कोटी रुपये आहे. गेल्या चार वर्षांत स्टार्टअप क्षेत्रात वार्षिक 66 टक्के वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी यातून 3.82 लाख कोटींचा नफा कमावला. हे नवे उद्योग रोजगार निर्माण करतात आणि अर्थव्यवस्थेला नाविन्यपूर्ण बनवतात, असे अहवालात म्हटलंय.

उत्पादन क्षेत्र आणि महिलांची भूमिका

उत्पादन क्षेत्रात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेमुळे 14 क्षेत्रांत 2.5 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे शेतीतील 43 टक्के लोकांना नवे रोजगार मिळतील. तसेच उच्च शिक्षणात 49 टक्के मुली असल्याने महिलांची कामातील सहभाग वाढेल. ज्यामुळे एकूण उत्पादकता आणि कुटुंबांची समृद्धी वाढेल.

डिजिटल व्यवहार आणि हरित ऊर्जेचा जोर

UPI मुळे 350 हून अधिक बँका जोडल्या गेल्या असून, 26 कोटींहून जास्त युजर्स आहेत. डिजिटल अर्थव्यवस्था 2014-2019 मध्ये 15.6 टक्क्यांनी वाढली, जी एकूण विकासापेक्षा दुप्पट वेगवान आहे. तसेच कर्जाची क्षमता जास्त असणे आणि स्वच्छ ऊर्जेवर भर (2070 पर्यंत नेट झिरो) यामुळे शाश्वत विकास साधला जाईल. इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी गुंतवणूक होत असल्याने पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोन्ही मजबूत होतील, असा विश्वासही अहवालात व्यक्त करण्यात आलाय.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!