Homeदेश-विदेशयूएसए डोनाल्ड ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलावर का हल्ला केला याचे स्पष्टीकरण डेल्टा फोर्सने...

यूएसए डोनाल्ड ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलावर का हल्ला केला याचे स्पष्टीकरण डेल्टा फोर्सने अध्यक्ष मादुरोला त्यांच्या पत्नीसह कोठे नेले?

यूएसए डोनाल्ड ट्रम्प यांनी मादुरोवर हल्ला का केला याचे स्पष्टीकरण: अगदी काल परवापर्यंत जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराची मागणी करणारे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण अमेरिकेमध्ये युद्धाची ठिणगी पडेल अशी कारवाई अमेरिकी लष्कराकडून करुन घेतली आहे. सद्दाम हुसैन, बगदादीनंतर अमेरिकेने एका देशाच्या राष्ट्राध्यक्षासहीत पत्नीला त्याच्या घरातून उचलून नेलं आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

अमेरिकेने केलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार,  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराने शनिवारी 3 जानेवारी 2026 रोजी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी कराकासमधील लष्करी तळ आणि महत्त्वाच्या सरकारी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यामध्ये किमान सात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता हे हल्ले करण्यात आले.

राष्ट्राध्यक्षांना राहत्या घरातून उचललं

एकीकडे हा हल्ला सुरु असतानाच दुसरीकडे अमेरिकी लष्कराच्या विशेष तुकडीने राष्ट्राध्यक्षांना राहत्या घरातून उचलल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यातील ‘डेल्टा फोर्स’ने ताब्यात घेतले असून त्यांना देशाबाहेर सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. मादुरे आणि त्यांच्या पत्नीच्या अटकेनंतरचा पहिला फोटोही समोर आल्याचे वृत्त आहे.

हल्ल्याचे कारण काय?

व्हेनेझुएलातील मादुरो सरकारची ‘हुकूमशाही’ संपवण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच तेथील अफाट तेल साठ्यांवर मादुरो सरकारचा प्रभाव असल्याने हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. अमेरिकेने यापूर्वीच मादुरो सरकारला ‘विदेशी दहशतवादी संघटना’ घोषित केले होते. त्यानंतर काही दिवसातच हा हल्ला करण्यात आला आहे.

व्हेनेझुएला सरकारने काय म्हटलं?

व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष मादुरो जिवंत असल्याचा पुरावा अमेरिकेने जगासमोर सादर करावा असंही रॉड्रिग्ज म्हणाले आहेत. रशिया आणि चीननेही अमेरिकेच्या या लष्करी कारवाईवरुन टीका केली आहे.

दक्षिण अमेरिकेत युद्ध अटळ?

या लष्करी संघर्षाला तोंड फुटण्याआधीच व्हेनेझुएला तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत होता. तेथील महागाईचा दर 600% पर्यंत पोहोचण्याची भीती वर्तवली जात होती आणि चलनाची किंमत जवळजवळ शून्य झाली होती. मात्र आता अमेरिकेने थेट हल्ला करुन राष्ट्राध्यक्षांनाच पळवून नेल्याने दक्षिण अमेरिकेत युद्धाची ठिणगी पडली आहे. याचे जागतिक राजकारणावरही परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!