Homeमनोरंजनसर्वात स्वस्त 365 दिवस 1 वर्षाचा प्लॅन रिचार्ज फक्त एवढ्या रुपयात 3gb...

सर्वात स्वस्त 365 दिवस 1 वर्षाचा प्लॅन रिचार्ज फक्त एवढ्या रुपयात 3gb डेटा अनलिमिटेड कॉल्स 100 sms jio किंवा airtel द्वारे नाही जाणून घ्या सर्वोत्तम bsnl प्लॅनबद्दल


सर्वात स्वस्त 365 दिवसांचा मोबाईल रिचार्ज प्लॅन: देशात सतत मोबाइल रिचार्जच्या किमतींमध्ये वाढ होत असतानाच बीएसएनएलने एक भन्नाट प्लॅन लॉन्च करत स्पर्धक कंपन्यांना धक्का दिला आहे. बीएसएनएलने मोबाइल युझर्सला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जिओ, एअरटेल आणि व्ही सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवलेली असतानाच बीएसएनएलने सर्वात स्वस्त वार्षिक प्लॅन बाजारात आणून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

या प्लॅनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य…

बीएसएनएलने भारतातील सर्वात परवडणारा वार्षिक मोबाइल रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसहीत येतो. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की एकदा रिचार्ज केल्यानंतर, संपूर्ण वर्षभर रिचार्ज करण्याचं टेन्शनच राहणार नाही.

किती आहे किंमत?

खाजगी कंपन्यांच्या तुलनेत हा प्लॅन स्वस्त आणि अधिक डेटा देणारा असल्याचं स्पष्ट होतं. जिओ आणि एअरटेलचे वार्षिक प्लॅन सामान्यमध्ये 3300 ते 3600 रुपयांदरम्यान आहेत. यापैकी बऱ्याच प्लॅनमध्ये दैनंदिन डेटा 2 जीबीपर्यंत मर्यादित आहे. मात्र बीएसएनएल 2799 रुपयांमध्ये रोज 3 जीबी डेटा ऑफर करत आहे. याचाच अर्थ कमी किंमतीत अधिक डेटा देणारा हा प्लॅन आहे. कमी किंमत अधिक डेटा आणि अधिक व्हॅलिडिटी असा तिहेरी फायदा या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे.

वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार

बीएसएनएलच्या या वार्षिक प्लॅनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य त्याची व्हॅलिडिटीच आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर पुन्हा वर्षभर रिचार्ज करण्याची गरज नाही. हा नंबर वार्षिक रिचार्जनंतर वर्षभर सक्रिय राहतो, ज्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता राहत नाही. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होते.

दररोज 3 GB डेटा

या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा दिला जातो. हा डेटा व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया, ऑनलाइन क्लासेस आणि ऑफिसच्या कामासाठी पुरेसा आहे. जास्त डेटा वापर असलेल्या युझर्ससाठी हा एक मोठा फायदा आहे.

अमर्यादित कॉलिंग

या वर्षिक प्लॅनमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंग दोन्ही अमर्यादित देण्यात आले आहेत. अतिरिक्त शुल्काशिवाय या प्लॅनमधून कोणत्याही नेटवर्कवर कॉल करता येतात.

अनलिमिटेड मेसेजेस

हा प्लॅन दररोज 100 एसएमएस देखील मोफत देतो. ओटीपी, बँक अलर्ट आणि महत्त्वाचे संदेश मिळविण्यासाठी रोज 100 मेजेची मर्यादा पुरेशी आहे. या साऱ्या वैशिष्ट्यांमुळे हा एक ऑल-इन-वन प्लॅन ठरतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

0
पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!