Homeदेश-विदेशमुंबई पुणे परतीचा प्रवास 60 मिनिटांत भारतातील पहिली बुलेट ट्रेन ताशी 320...

मुंबई पुणे परतीचा प्रवास 60 मिनिटांत भारतातील पहिली बुलेट ट्रेन ताशी 320 किमी वेगाने धावेल मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

बुलेट ट्रेन: देशातील पहिली बुलेट ट्रेन लवकरच धावणार आहे.  नवीन वर्षाच्या निमित्ताने, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट दिली. 15 ऑगस्ट 2027 पर्यंत भारताला पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनच्या कामाची अपडेट देताना रेल्वे मंत्र्यांनी याचे तिकीट दर किती असतील याची देखील घोषणा केली. 320 KM प्रतितास इतका महाप्रचंड स्पीडने ही बुलेट ट्रेन धावणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

सुरुवातीला ही ट्रेन गुजरातमधील सुरत आणि बापी दरम्यान धावेल. पहिल्या टप्प्यात सुरत आणि बिलीमोरा दरम्यान सेवा सुरू होईल. त्यानंतर वापी ते सुरत असा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे.  शेवटी, मुंबई ते अहमदाबाद हा संपूर्ण हाय-स्पीड कॉरिडॉर कार्यान्वित होईल. रेल्वेमंत्र्यांनी हलक्या स्वरात लोकांना आतापासूनच तयारी करण्याचे आवाहन केले.  15 ऑगस्ट 2027 रोजी म्हणजेच पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनी भारतीय हा पहिल्या बुलेट ट्रेनने प्रवास करतील.  पहिल्या टप्प्यात, ही ट्रेन सुरत ते वापी दरम्यानच्या 100 किलोमीटरच्या मार्गावर धावेल. एकदा प्रकल्प पूर्ण झाला की, मुंबई आणि अहमदाबा या दोन्ही मेट्रो शहरांमधील 508 किलोमीटरचा प्रवास दोन तास 17 मिनिटांत पूर्ण होईल. या ट्रेनचा स्पीड पाहिला असता मुंबई पुणे मार्गावर ही बुलेट ट्रेन धावली असती तर मुंबई पुणे रिर्टन प्रवास 60 मिनिटांत झाला असता. मुंबई ते पुणे 155 KM इतके अंतर आहे. या प्रवासासाठी रेल्वे तसेच हायवेने गेल्यास 4 तासांचा वेळ लागतो.

बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सुमारे 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरतमध्ये या प्रकल्पाचा आढावा घेतला होता. ही ट्रेन जपानच्या शिंकानसेन हाय-स्पीड ट्रेनच्या धर्तीवर धावेल. तिचा कमाल वेग ताशी 320 किलोमीटर असेल. संपूर्ण प्रकल्पात अहमदाबाद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, ठाणे आणि मुंबईसह एकूण 12 स्थानके असतील. प्रकल्पाचा 85 टक्के भाग, किंवा अंदाजे 465 किलोमीटर, एलिव्हेटेड असेल, ज्यापैकी 326 किलोमीटर पूर्ण झाले आहेत.

बुलेट ट्रेनचे भाडे किती असेल याबद्दल आता अनेकांना प्रश्न पडला आहे. ते अद्याप अधिकृतपणे अंतिम झालेले नाही, परंतु प्रारंभिक अंदाज समोर आले आहेत. मुंबई ते अहमदाबाद या संपूर्ण प्रवासाचे भाडे 3000 ते 5000 रुपयांपर्यंत असू शकते. हे भाडे विमान प्रवासापेक्षा स्वस्त असण्याची शक्यता आहे.
चीन, जपान, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, इटली आणि तैवानमध्ये बुलेट ट्रेन धावतात. चीनमध्ये सर्वात लांब नेटवर्क आहे. जपानने 1964 मध्ये पहिली बुलेट ट्रेन सुरू केली. फ्रान्स आणि जर्मनी देखील आघाडीच्या हाय-स्पीड रेल्वे कंपन्या आहेत. अमेरिका, इंडोनेशिया आणि मोरोक्कोमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

रविवारचे टॅरो राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांची पैशांची अडचण संपेल, कुंभ राशीच्या लोकांना नातेवाईकाकडून अचानक मदत...

0
रविवार, 18 ऑक्टोबरला कन्या राशीच्या लोकांच्या पैशांशी संबंधित जुन्या समस्येवर व्यावहारिक तोडगा निघू शकतो. नातेसंबंधांमधील जुने मतभेद दूर होऊन नव्या सुरुवातीचे संकेत मिळत...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!