Homeदेश-विदेशmaharashtra weather news 2 जानेवारी 2026 मुंबई विदर्भात पावसाची थंडीची लाट नाशिक...

maharashtra weather news 2 जानेवारी 2026 मुंबई विदर्भात पावसाची थंडीची लाट नाशिक मराठवाडा ज आणि k हिमाचल ताज्या अपडेट

महाराष्ट्राच्या हवामान बातम्या: देशभरात हवामानामध्ये सातत्यानं बदल होत असून, हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येसुद्धा धुक्याची चादर, थंडीचा कहर आणि हिमवर्षाव अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. मात्र, महाराष्ट्राचं सांगावं तर राज्यात गेल्या 24 तासांमध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्यामुळं अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. अशा या वातावरणाचा परिणाम पुढील 24 तासांमध्येसुद्धा पाहायला मिळणार असून, अंशत: ढगाळ वातावरण आणि त्यामुळं कमाल तापमानात काशी अंशांची वाढ अपेक्षित असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. थोडक्यात राज्यात गारठा काहीसा कमी होईल. मात्र पहाटे आणि रात्री जाणवणारी थंडी काही इतक्यात पाठ सोडणार नाही.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काही अंशांनी कमाल तापमानात वाढ होईल ज्यामुळं गारठा दिवसा अंशत: कमी असल्याचं जाणवणार आहे. घाटमाथ्यावर मात्र झोंबणारा गार वारा थंडी अद्यापही मुक्काम ठोकून आहे याचीच अनुभूती देणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं पुणे, पाचगणी, कोल्हापूर आणि कोकणासह राज्याच्या इतरही घाट क्षेत्रांचा समावेश आहे. राज्यात तूर्तास पावसाचा इशारा नाही.

तापमान अंश सेल्सिअसमध्ये (कमाल/ किमान)

पुणे- 29.7 / 10.6
धुळे- 30.0/ 10.0
कोल्हापूर- 29.3/ 16.0
सातारा- 30.9/11.4
रत्नागिरी- 30.1 / 29.2
मुंबई- 29.4/ 21.3

भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात थंडी कायम असेल, प्रामुख्यानं मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार इथं थंडीची लाट कायम असेल. उत्तर प्रदेशात बहुतांशी धुक्याची चादर असल्यानं नागरिकांना दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असून यामुळं रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याचं चित्र आहे.

पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि बिहारच्या काही भागांसाठी आयएमडीनं ‘कोल्ड डे’चा इशारा जारी केला असून, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पश्चिमी हिमालय क्षेत्र जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन दिवस हलका पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं पर्वतीय क्षेत्रांमध्ये तापमानात घट होऊ शकते असा इशारा जारी करण्यात आला आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!