देशानुसार मद्य सेवन: 31 डिसेंबर 2025 म्हणजेच वर्षाचा शेवटचा दिवस जगभरात साजरा होतोय. प्रत्येकाची सेलिब्रेशनची व्याख्या वेगळी आहे. काहीजण घरच्याघरी साध्या पद्धतीने तर काहीजण दारु पिऊन सेलिब्रेट करतात. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार जगातील सर्वाधिक दारू सेवन करणाऱ्या देशांची यादी जाणून घेऊया.
रोमानिया
हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. इथे दरडोई व्यक्ती दरवर्षी साधारण 17 लिटर शुद्ध अल्कोहोल म्हणजे दारूतील खरा अल्कोहोलचा भाग पिते. रोमानियामध्ये दारूला अतिथी सत्काराचे आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते. तिथे घरी बनवलेली पारंपरिक दारू, जसे की फळांपासून तयार होणारी ‘टुइका’, खूप लोकप्रिय आहे. तसेच दारूवर कमी कर आणि स्वस्तात मिळणाऱ्या बेकायदा दारूमुळेही सेवन जास्त आहे.
जॉर्जिया
दुसऱ्या स्थानावर आहे. इथे दरवर्षी दरडोई सुमारे 14.3 लिटर शुद्ध अल्कोहोलचे सेवन होते. जॉर्जियामध्ये द्राक्षांपासून बनवलेली वाइन खूप प्रसिद्ध आहे आणि ती दैनंदिन जीवनाचा भाग आहे.
चेक रिपब्लिक (झेक प्रजासत्ताक)
तिसऱ्या क्रमांकावर. इथे दरडोई 13.3 लिटर इतके सेवन आहे. बियरची परंपरा येथे खूप मजबूत आहे.या व्यतिरिक्त इतर काही देशही जास्त दारू पितात, पण रोमानिया खूप पुढे आहे.
भारताचा क्रमांक
भारत या यादीत अगदी खाली आहे. म्हणजे सर्वाधिक दारू पिणाऱ्या देशांमध्ये नाही. इथे दरडोई व्यक्ती दरवर्षी फक्त 3 ते 5 लिटर शुद्ध अल्कोहोलचे सेवन करते (साधारण 3.2 ते 4.98 लिटर). हे खूप कमी आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे धार्मिक श्रद्धा, सामाजिक नियम आणि सांस्कृतिक मूल्ये. भारतात अनेक धर्म आणि समुदायांमध्ये दारू पिणे टाळले जाते किंवा निषिद्ध मानले जाते.पण अलीकडे काही बदल दिसत आहेत. शहरांमध्ये राहणीमान बदलणे, उत्पन्न वाढणे, महागड्या ब्रँडची मागणी, तरुणांमध्ये तणाव आणि नवीन जीवनशैली यामुळे दारूचे सेवन हळूहळू वाढते आहे. जास्त दारू टाळण्यासाठी कडक नियम आणि जागरूकता आवश्यक आहे. रोमानिया सारख्या देशांमध्ये दारू पिणे रोजच्या जीवनशैलीचा भाग आहे. तर भारतासारख्या देशांमध्ये ते कमी आहे.
जगभरात दारूचे सेवन वेगवेगळे
काही देशांमध्ये ते संस्कृतीचा भाग आहे, तर काही ठिकाणी कायदे कडक आहेत. पण जास्त दारू पिणे आरोग्यास हानिकारक आहे. यकृताचे आजार, हृदयाचे विकार, सामाजिक समस्या आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. कोणतंही व्यसन वाईटच. ‘झी २४ तास’ याला दुजोरा करत नाही.)





















