घटस्फोट प्रकरणाचा व्हायरल व्हिडिओ : आतापर्यंत तुम्ही कोर्टातील अनेक घटस्फोटांच्या प्रकरणांबद्दल ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. मात्र कर्नाटकमधील एका घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये निकाल लागल्यानंतर कोर्टाच्या आवारात जे काही घडलं ते सध्या चांगलेच चर्चेत आहे. कर्नाटकमधील फॅमेली कोर्टाच्या आवारात एका महिलेने घटस्फोटाचा प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिने त्याला अनेकदा कानाखाली लगावल्या. काही मिनिटांपूर्वी ज्या व्यक्तीपासून ती विभक्त झाली त्याचे ती केस ओढत होती. त्याला शिवागाळ करत होती. सर्वांसमोर ती त्याला मारहाण करत होती.
जेवढं ती मारत होती तो तितकं हसत होता
मात्र या साऱ्या गोंधळादरम्यान आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मार खातानाही या महिलेचा पती हसत आणि स्मितहास्य करत होता. खरं तर तो मार खातोय आणि चारचौघात ती आपल्याला मारतेय याची त्याला लाज वाटत होती किंवा वाईट वाटत असल्यासारखं वाटत नव्हतं. उलट पत्नी मारहाण करत असताना तो या साऱ्याचा आनंद घेत होता असे वाटत होते. जणू तो तिला म्हणत होता, “मला आणखी मार, मी हसतच राहीन.” प्रत्येकवेळेस पत्नीने कानाखाली मारल्याने तो त्याच्या घटस्फोटीत पत्नीकडे हसून पाहत होता. पती मार खाताना हसत असल्याचे पाहून पत्नीला आणखीनच राग आला. ती जितकी चिडली, की त्याला जास्त जोरजोरात मारू लागली. मात्र असं केल्यावर तो तितकाच जास्त हसत आणि त्याचा आनंद घेत राहिला.
सगळेच गोंधळून गेले; पण यामागील खरी कथा काय?
हा सारा प्रकार पाहून आजूबाजूचेही गोंधळले. मात्र त्यामागील खरं कारण वेगळं होतं. खरं तर या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. पत्नी स्वतः सुशिक्षित असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. तिने तिच्या पतीकडे पोटगी म्हणून दरमहा सहा लाख रुपयांची मागणी केली होती. अंतिम तोडगा निघण्यापूर्वी पतीने त्याची सर्व मालमत्ता आईच्या नावावर हस्तांतरित केली होती. कायदेशीररित्या, त्याच्या नावावर एक पैसाही शिल्लक नव्हता. जेव्हा घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने त्याचे उत्पन्न आणि मालमत्ता तपासली, तेव्हा त्याच्या नावावर काहीही संपत्ती नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे न्यायालयाने अंतिम निकाल देताना पत्नीला द्यावा लागणाऱ्या पोटगीची रक्कम शून्य रुपये असेल असं निश्चित करण्यात आलं. दरमहा सहा लाख रुपयांवरून पोटगीची रक्कम शून्यावर आल्याने पत्नीला संताप अनावर झाला. मात्र न्यायालयाच्या निकालासमोर ती काहीच करु शकली नाही.
सगळा राग त्याच्यावर काढला पण…
निकालानंतर, जेव्हा हे दोघे न्यायालयाबाहेर येताच पत्नीने आपला सर्व राग पतीवर काढला. तिच्या ओरडण्याने, शिवीगाळ करण्याने आणि मारहाण करण्याने पतीला राग येण्याऐवजी एक विचित्र समाधान मिळत होते, असं त्या दोघांकडे पाहून वाटत होतं. प्रत्येक वेळी ती त्याला मारत असे, तेव्हा तो अधिक शांतपणे हसत होता. तिच्याकडे शांतपणे पाहत तो हसताना दिसला. आपण इतके चिडलेलो असताना एक माणूस इतका आनंदी असल्याचे पाहून पत्नीला आणखीनच राग येत होता. प्रत्येक वेळेस तिने कानाखाली मारल्यानंतर तिच्या घटस्फोटीत पतीचे हास्य अधिकच खुलत होते.
माजी विद्यार्थ्यांच्या प्रेमसंबंधामुळे पत्नीने घटस्फोट घेतला.
पतीने सर्व मालमत्ता आईला हस्तांतरित केली होती.
बायकोला राख सापडली..भाऊ, घटस्फोटानंतर तुम्ही हसत आहात आणि स्वतःला मारता आहात, संपूर्ण पुरुष समाजाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा! pic.twitter.com/Yxw7moQSjW
— अंकित रावल (@ankitrawal5454) 29 डिसेंबर 2025
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसत असून अनेकांनी या पुरुषाने योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.





















