Homeदेश-विदेशपोर्तुगालमधील दारे नसलेल्या शौचालयाची संकल्पना जगभरात इंटरनेटवर पसरली आहे

पोर्तुगालमधील दारे नसलेल्या शौचालयाची संकल्पना जगभरात इंटरनेटवर पसरली आहे

दारे नसलेली शौचालये: सोशल मीडियात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय? याची माहिती आपल्याला कळत असते. यावर आपण आपल्या प्रतिक्रियादेखील नोंदवत असतो. अशीच एक पोस्ट जगभरात इंटरनेटवर व्हायरल होतेय. पोर्तुगालच्या लिस्बन विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये एका महिलेच्या प्रसाधनगृहात टॉयलेटच्या जागा (स्टॉल्स) उघड्या आहेत. त्यांना दारे नाहीत, फक्त छोट्या भिंती आहेत ज्यात प्रायव्हसी मिळत नाहीत. समोर मोठा आरसा आहे. ज्यामुळे आत बसलेल्या व्यक्तीला सर्व काही दिसते. ही रचना पाहून लोक हैराण झाले आहेत. कारण अशी जागा वापरताना खूप अवघडल्यासारखे वाटणे साहजिक आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

व्हिडिओ कसा तयार आणि व्हायरल झाला?

सप्टेंबर 2025 मध्ये एका अमेरिकन प्रवाशी महिला बेलेंसिया वॉलेसने हा व्हिडिओ काढला. ती क्रूझ शिपवरून प्रवास करत होती आणि विमानतळावर थांबली होती. तिने मुख्य दार लावून आत व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ प्रथम ‘व्हायरल हॉग’वर अपलोड झाला. यानंतर डेली मेलने इंस्टाग्रामवर शेअर केला. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि त्यावर चर्चा सुरु केली.

महिलेची प्रतिक्रिया काय होती?

व्हिडिओ काढणाऱ्या महिलेला हे पाहून धक्का बसला. ‘पोर्तुगाल… आपल्याला बोलायचे आहे’ अशी कॅप्शन लिहित पोस्ट केली. तिने हसत-खेळत सांगितले की, येथे खासगीपणा शून्य आहे आणि समोरचा आरसा सर्व काही दाखवतो. तरीही तिने दुसऱ्या भागात जाऊन जिथे दार होते तिथे जाऊन मी प्रसाधनगृह वापरले आणि मला आराम वाटल्याचे ती म्हणाली.

इंटरनेटवर लोक काय बोलतायत?

लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. काहींना हे स्वप्नासारखे वाटतंय. ‘हे माझ्या वाईट स्वप्नातील प्रसाधनगृह आहे!’ अशी प्रतिक्रिया एकाने दिलीय. काहीजण यावर हसत म्हणतात, “सर्वजण पाहत असताना कसे वापरायचे?” पण बरेचजण या फोटोला चुकीचे किंवा फसवा असल्याचे म्हणतायत.

खरे आहे की खोटे?

‘मी पोर्तुगीज आहे, असे प्रसाधनगृह मी कधी पाहिले नाही. हे बांधकाम चालू असावे किंवा लहान मुलांचे प्रसाधनगृह असावे.” विमानतळावर अनेकदा प्रवास करणारेही म्हणतात की असे काही नाही. त्यामुळे हा व्हिडिओ दिशाभूल करणारा वाटतो, पण तरीही तो मजेदार चर्चेचा विषय झाला आहे.

या गोष्टीमागचे कारण काय असू शकते?

हा भाग कदाचित कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी बनवलेला असावा, जिथे पालक मुलांना पाहू शकतात. किंवा इथले बांधकाम अपूर्ण असावे, असा अंदाज बांधला जातोय. पोर्तुगालमध्ये प्रसाधनगृहांच्या रचनेबद्दल अनेकदा चर्चा होते, पण असे पूर्णपणे उघडे प्रसाधनगृह असणे हे नक्कीच सामान्य नाही.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!