Homeदेश-विदेशपरिक्षा पे चर्चा 2026 पीएम मोदी कार्यक्रमासाठी कमी नोंदणी

परिक्षा पे चर्चा 2026 पीएम मोदी कार्यक्रमासाठी कमी नोंदणी

Pariksha Pe Charcha 2026 Registration: दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’कडे यंदा महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी पाठ फिरवली आहे की काय? असा सवाल उपस्थित केला जातोय.  पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नोंदणीसाठी सध्या शिक्षण विभागाची धावाधाव सुरू आहे. या कार्यक्रमासाठी राज्याला 65 लाख विद्यार्थी, शिक्षक पालकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले असताना याच्या पाच टक्के उद्दिष्टही पूर्ण झालेलं नाही. आतापर्यंत केवळ जेमतेम पावणेतीन लाखच नोंदणी झाल्याने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे आहे.

कुठे आणि कशी होते नोंदणी?

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. ‘परीक्षा पे चर्चा 9’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी ऑनलाइन ‘एमसीक्यू’ पद्धतीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती यापूर्वी 3 आणि 8 डिसेंबरच्या परिपत्रकाद्वारे कळवण्यात आली होती. ती माहिती विभागातील, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या निदर्शनास पुन्हा आणून देऊन आणि पालक, एकूण 65 लाख विद्यार्थी, शिक्षक सहभागी होण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. मात्र, 22 डिसेंबरपर्यंत केवळ 2 लाख 78 हजार 535 जणांचीच नोंदणी झाली आहे. याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सहसचिवांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे डॉ. पालकर यांनी नमूद केले आहे.

कधीपासून आयोजित केली जात आहे, ‘परीक्षा पे चर्चा’?

‘परीक्षा पे चर्चा’ मोहीम 2018 मध्ये सुरू झाली आणि दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात आयोजित केली जाते. पहिल्या आवृत्तीपासून ते आतापर्यंत (2025 पर्यंत) ही चर्चा दिल्लीतील भारत मंडपम किंवा इतर ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षक भाग घेतात. 2025 च्या आवृत्तीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना तणावावर मात करण्याचे मंत्र दिले होते. या कार्यक्रमात विद्यार्थी पंतप्रधानांना थेट प्रश्न विचारू शकतात, आणि ते उत्तर देतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दूर होतात. कार्यक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने आयोजित केला जातो, आणि तो दूरदर्शन, यूट्यूब आणि इतर माध्यमांवर थेट प्रसारित केला जातो.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!