एपस्टाईनने डोनाल्ड ट्रम्प नवीनतम अपडेट फाइल केले: अमेरिकेसह सध्या संपूर्ण जगभरात एकाच प्रकरणाची चर्चा असून, हे प्रकरण म्हणजे ‘एपस्टीन फाईल्स’. बड्या सेलिब्रिटींची नावं यामध्ये समोर आल्या कारणानं एपस्टीन आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या असंख्य संशयास्पद घटनांची साखळी पाहता हे एक मोठं प्रकरण काही पुराव्यांमुळं चर्चेचा विषय ठरत आहे. तर, एपस्टीननं शोषण केलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीची मागणी अमेरिकेत अधिक तीव्र होताना दिसत आहे.
अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेवर वाढणारा हा दबाव पाहता त्यांच्याकडून एपस्टीन प्रकरणातील तपासाशी संबंधित पुराव्यांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेला एक अत्यंत गंभीर आरोप भुवया उंचावून जात आहे. दस्तावेजांमध्ये नमूद असणाऱ्या काही पुराव्यांमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यानुसार काही वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी एका महिलेवर बलात्कार केला होता. हे आरोप अतिशय धक्कादायक असले तरीही न्याय विभागानं ते पूर्णत: फेटाळून लावत त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
मंगळवार, 23 डिसेंबर 2025 ला जारी करण्यात आलेले पुरावे ‘ट्रान्सपरन्सी अॅक्ट’अंतर्गत प्रसिद्घ करण्यात आले. यामध्ये एपस्टीनशी संबंधित काही गंभीर पुरावे जारी करण्यास न्यायव्यवस्था बांधील होती. मात्र हे पुरावे समोर आणले असले तरीही त्यातील आरोपांची कोणत्याही प्रकारे शाहनिशा करण्यात आली नतून त्यांकडे अंतिम सत्य म्हणून पाहू नये असं आवाहन केलं जात आहे.
सनसनाटी आरोप आणि पुरावे…. नेमकं काय सुचवू पाहत आहेत ही छायाचित्र?
अमेरिकेसह संपूर्ण जगभरात एपस्टीन फाईल्समधील पुराव्यांनी असंख्य प्रश्नांना वाव दिलेला असतानाच अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेनं मात्र ही परिस्थिती पाहता यातील काही आरोप 2020 च्या राष्ट्रपती निवडणुकीआधीच एफबीआयला पाठवण्यात आले होते जे निराधार असल्याचं सांगितलं. ‘हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे की, केले जाणारे जावे असत्य आणि निराधार असून, त्यामध्ये तसूभरही सत्य असतं तर त्यांचा वापर याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात केला हेला असता’, असं विधान न्यायव्यवस्थेनं जारी केलं आहे.
वाहन चालकानं ऐकलेली ‘शोषणाची’गोष्ट…
दरम्यान जारी करण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये यंत्रणांना प्राथमिक स्तरावरील आरोपांचीही माहिती पुरवण्यात आली आहे. यामध्ये एका कथित पीडितेचा आरोप आहे, ज्यामध्ये ट्रम्प आणि एपस्टीननं तिच्यावर बलात्कार केल्याचा दावा करण्यात आला. एका लिमोजिन कार चालकानंही यावर जबाब दिला याहे. ज्यामध्ये त्यानं ट्रम्प आणि एपस्टीनकडून एका मुलीचं ‘शोषण’ केल्याची चर्चा ऐकल्याचा दावा त्यानं केला. मात्र या पुराव्यांमध्ये एफबीआयकडून पुढे कारवाई करण्यात आली की नाही, याची मात्र स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. असंही म्हटलं जात आहे की, आरोप करणाऱ्या महिलेचा पुढं डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला होता.
सदर प्रकणी पुराव्यांमध्ये कुठंही ट्रम्प यांना या प्रकरणात कुठंही दोषी ठरवण्यात आलं नसून, त्यांच्याविरोधाच औपचारिक चौकशीचीही नोंद नाही. असं असलं तरीही, ट्रम्प आणि एपस्टीन 2000 च्या दशकाच्या मध्यापर्यंत एकमेकांच्या संपर्कात होते हे मात्र दिसत आहे. याचा अर्थ त्यांचा गुन्ह्यामध्ये मात्र थेट संबंध दिसून येत नाही याचा पुनरुच्चार न्याय व्यवस्थेनं केला आहे.
एपस्टीन फाईल्सप्रकरणी 30000 पुरावे प्रसिद्ध
एपस्टीन फाईल्सप्रकरणात आतापर्यंत 30 हजार पुरावे प्रसिद्ध करण्याचत आले असून, यामध्ये ईमेल, फोटो आणि तत्सम गोष्टींचाही समावेश आहे. मात्र कागदपत्रांमध्ये नाव आहे म्हणजे ती व्यक्ती दोषी, याचा असा अर्थ होत नसल्याच्याच भूमिकेवर अमेरिकी न्याय व्यवस्था ठाम असून, आता या प्रकरणाला पुढं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.





















