Homeदेश-विदेशEpstein Files jeffery epstien with a lady Ghislaine Maxwell | Epstein Files...

Epstein Files jeffery epstien with a lady Ghislaine Maxwell | Epstein Files च्या पुराव्यांमधील फोटोमध्ये जेफ्री एपस्टीनसह दिसणारी ‘ही’ महिला नक्की आहे तरी कोण?

जेफ्री एपस्टाईनसोबत दिसणारी ‘ही’ महिला नेमकी कोण आहे: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वक्तव्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजवली होती. कराड येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी “पुढच्या महिन्याभरात एक मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो, 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी खळबळ होईल” असे वक्तव्य केले होते. दरम्यान काल (19 डिसेंबर 2025 शुक्रवारी) आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या एपस्टीन फाईल या प्रकरणातील काही पुरावे समोर आले. ‘एपस्टीन फाईल’ हे एक सेक्स स्कँडल प्रकरण आहे. ज्यामध्ये बिल गेट्स ते अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन यांची नावे समोर आली आहेत. तसेच काही फोटोही समोर आले आहेत. मात्र नावे आणि फोटो असणे म्हणजे प्रकरणात सहभागी झाल्याचा पुरावा नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

जेफ्री एपस्टीनसह दिसणारी ‘ही’ महिला कोण?

एपस्टीन फाईल्स म्हणजे अमेरिकन फायनान्सर आणि बाल लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन आणि या गुन्ह्यात त्याच्यासह सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती देणारे कागदपत्र आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, महिला आणि मुलींची तस्करी यांसारख्या अमानुष कृत्यांच्या गुन्ह्यांसाठी दोषी असणारा आरोपी जेफ्री एपस्टीन आणि घडलेल्या घटनांच्या जगभरात चर्चा सुरू होत्या. यानंतर काल 19 डिसेंबर 2025 रोजी अमेरिकी काँग्रेसच्या निर्देशांनंतर या प्रकरणातील पुरावे टप्प्याटप्प्याने जगासमोर येण्यास सुरूवात झाली आहे. या पुराव्यांमधील काही फोटोंमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध चेहऱ्यांसह आणखी एक चेहरा सतत समोर येत होता. तो म्हणजे जेफ्रीसह फोटोंमध्ये दिसणारी महिला. फोटोंमध्ये जेफ्री एपस्टीनसह उभ्या असणाऱ्या या महिलेचे नाव ‘घिसलेन मॅक्सवेल’ असे आहे.

घिसलेन मॅक्सवेल आणि जेफ्रीचा संबंध काय?

घिसलेन मॅक्सवेल ब्रिटिश आणि अमेरिकेतील माजी समाजसेविका होती. जेफ्री आणि मॅक्सवेलची ओळख अशी की,ती जेफ्री एपस्टीनची एक्स गर्लफ्रेंड होती. जेफ्री आणि मॅक्सवेलची भेट 1990 च्या दशकात न्यूयॉर्क डेली न्यूजमध्ये काम करत असताना झाली होती. यानंतर याच दशकाच्या काही काळात ते एकत्र होते. पुढे त्यांचे प्रेमसंबंध संपल्यानंतरही ते दोघे एकमेकांचे जवळचे मित्र आणि व्यावसायिक सहकारी म्हणून राहत होते. 2003 मधील व्हॅनिटी फेअर प्रोफाइलमध्ये जेफ्रीने मॅक्सवेलला “माझी बेस्ट फ्रेंड” म्हणून संबोधले होते. त्यांना त्यांच्या या मैत्रीचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.  मॅक्सवेलने तिच्या उच्चपदाचा आणि ओळखीचा वापर करून एपस्टीनची ओळख प्रिन्स अँड्र्यू, बिल क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांशी करून दिली होती.

मॅक्सवेलची सध्याची स्थिती काय?

2008 मध्ये जेफ्रीला जवळजवळ 40 अल्पवयीन मुलींना वेश्यावृत्तीच्या जाळ्यात खेचण्याच्या आणि लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी मानत 13 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर 2015 मध्ये प्रकरणाचे सगळे फासे घिसलेन मॅक्सवेलकडे फिरले आणि तिलाही या प्रकरणात जेफ्रीची सहकारी म्हणून दोषी मानण्यात आले.

पुढे 2022 मध्ये मॅक्सवेलला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. सध्या तिला टेक्सासमधील ब्रायन येथील किमान सुरक्षा असलेल्या संघीय तुरुंग छावणीत (Federal Prison Camp) ठेवण्यात आले आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...
spot_img

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
error: Content is protected !!